धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी व श्री. लंबोदर तरुण गणेश मंडळ, उंबरे कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून, समाजातील प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे वर्षभर सातत्याने शहरातील राजा कंपनी तरुण मंडळ राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांनी श्रीच्या आरती प्रसंगी झालेल्या सत्कार सोहळ्यानंतर बोलताना सांगितले. यावेळी पुढे बोलताना आ. पाटील यांनी मंडळाचे हे 49 वे वर्ष असून पुढील वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या प्रमाणात शहरात व…
परंडा / प्रतिनिधी परंडा -भूम- वाशी मतदारसंघाचे आमदार, माजिमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांचे सुपुत्र गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार’तर्फे वडकी येथील वृद्धाश्रम व गुरुकुलमध्ये सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून, त्यांचे अश्रू पुसत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम जेव्हा सृजनशील विचारांचे तरुण नेतृत्व हातात घेते, तेव्हा समाज परिवर्तनाची खरी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी धाराशिव / प्रतिनिधी पावसाच्या दीर्घ खंडाने हिरव्यागार शिवाराची जागा करपलेल्या पिकांनी घेतली आहे. हंगामासाठी केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जात असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर भविष्याची चिंता आहे.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २३) तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील व्यापारी गणेश मंडळतर्फे आयोजित मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात गरजू -गरीब २६ मोतीबिंदू रुग्णाचे निदान करून शस्त्रक्रियेसाठी सोलापूर येथील एच व्ही साबळे आय हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. याकरिता नयन ऑप्टिकल व व्यापारी गणेश मंडळानी सहकार्य केले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करण्यात येणार आहे, याप्रसंगी व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त नेत्र…
परंडा / प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी धाराशिव जिल्हा दौऱ्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत नीरा भीमा जोड बोगदा व जेऊर बोगद्याचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली याबाबत मा. आ. ठाकूर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता, जलविज्ञान विभागाचे पाणी उपलब्धता…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर धाराशिव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र या नावाची कमान प्रवेशद्वारासमोर उभी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवक जिल्हाध्यक्ष रणजीत बनसोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले…
संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय कळंब तालुक्यातील मलकापूर येथील पीक नुकसानीची केली पाहणी धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे.या संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर)…
आरोपीकडून ०१ जबरी चोरीचा गुन्हा उघड, १० गुन्ह्यांत पाहिजे आरोपी, तपासाला गती… धाराशिव / प्रतिनिधी दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव चे सपोनि कासार व पथकाकडून माला विषयी गुन्हे उघडकीस आणणे, तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दोन संशयित इसमांना भुम परिसरातून ताब्यात…
धाराशिव / प्रतिनिधी स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे श्री गणरायांच्या आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी छत्रपती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दादा देशमुख सर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कावरे सर, माजी विद्यार्थी व पोलीस कॉन्स्टेबल अमित वाघमारे तसेच प्राध्यापक गीते सर यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात…