Live News…..Breaking News!

.

  • दुष्काळ जाहीर झाला; आता शेतकऱ्यांच्या हातात काय देणार?

    आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल; खानापूरच्या बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद तुळजापूर / प्रमुख राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त राज्य सरकारने घोषित केल्यानंतर आता या दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या बांधावर आणि हातात प्रत्यक्ष काय मदत पोहोचणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांद्वारे स्पष्ट करावे व शेतकऱ्यांना धीर द्यावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी मंत्री युवासेना प्रमुख…

  • मांजरा शुगर (कंचेश्वर) मंगरुळ कारखान्याचा सन बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२६-२७ च्या रोलर पुजन, बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम शुक्रवार (ता. २५) रोजी कारखान्याचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी मा.दिलीपराव देशमुख स व लातुर ग्रामीणचे मा. आमदार तथा लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज…

  • लाडक्या गणरायास वाजत – गाजत, ढोल – ताश्याच्या गजरात धाराशिवकरानी दिला भावपूर्ण निरोप

    धाराशिव / प्रतिनिधी पारंपरिक ढोल – ताश्याच्या गजरात लेझीमच्या तालावर विविध साहसी कला व क्रीडा प्रकार सादर करीत धाराशिव शहरातील गणेश मंडळानी व समस्त धाराशिवकरानी लाडक्या गणरायास ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” म्हणत भावपूर्ण निरोप दिला. धाराशिव शहरात आनंद चतुर्दशीच्या निमित्ताने निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तीभाव, उत्साह, कलात्मकता, सार्वजनिक शिस्त…

  • परंडा उपजिल्हा रुग्णालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती उपक्रम

    परंडा / प्रतिनिधी सेवा संकल्प अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, परंडा व शिवाजी नगर गणेश मंडळ परंडा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ.जुबेर मोमीन यांच्या मार्गदर्शनानुसार विविध आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये आयुष्यमान कार्ड काढने तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम तसेच अंतर्गत गर्भवती महिलांची व नागरिकांची…

  • परंडा शहरात वाजत- गाजत लाडक्या गणरायास निरोप

    बालवीर गणेश मंडळाच्या ढोल-ताशा पथकाने वेधले लक्ष परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात विविध गणेश मंडळानी लाडक्या गणरायास ढोल ताष्याच्या गजरात व लेझीम च्या निनादात विसर्जन मिरवणुकीत ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत समस्त परंडावासियांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश मंडळाच्या वतीने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश विसर्जन…

  • आकांक्षाताई चौगुले यांच्या उपस्थितीत ज्ञानज्योती महिला पतसंस्था लोहारा वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

    लोहारा / प्रतिनिधी ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि. जि.धाराशिव शाखा लोहारा ची 4 थी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील बसवेश्वर मंदिरात दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी पतसंस्थेच्या अध्यक्षा तथा उमरगा पं.स.सभापती आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, लोहारा पं.स.सभापती पल्लवीताई जानकर, व्हाईस चेअरमन तथा नगरपंचायतीच्या गटनेत्या…

  • महागणेशोत्सव’ महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सांस्कृतिक जागर — विद्याचरण कडवकर

    धाराशिवमध्ये दोन दिवस विविध कलाविष्कारांची मेजवानी धाराशिव / प्रतिनिधी सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे.समाजप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता आणि लोककलांच्या संवर्धनाची परंपरा या उत्सवाने जपली आहे.त्यामुळे धाराशिवमध्ये आयोजित ‘महागणेशोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक जागर ठरेल,असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण…

  • २९ सप्टेंबरचा ‘रोजगार महाकुंभ’ स्थगित

    विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय ; जिल्ह्यातील १२ ठिकाणचे रोजगार मेळावे पुढे ढकलले धाराशिव / प्रतिनिधी युवकांच्या हाताला रोजगार मिळावा,स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात आणि कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात स्थगित करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर…

  • उजनीतून धाराशिवला १ टीएमसी पिण्याचे पाणीमुख्यमंत्र्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद;

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील गंभीर पाण्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी १ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. काल करजखेडा येथील पाहणी दरम्यान मुख्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्णतः कोरडा असलेला पाटबंधारे तलाव दाखवत जिल्ह्यातील पाण्याची भीषण…

  • दुष्काळी परिस्थितीमुळे घरगुती गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करा; धाराशिव नगरपालिकेचे आवाहन

    गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींची स्वतः व्यवस्था करावी, मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त, सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था सज्ज धाराशिव / प्रतिनिधी या वर्षी जिल्ह्यात असलेली दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने श्री गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन केले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाची आपल्या स्तरावर योग्य व्यवस्था करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी घरगुती गणपतीचे…