Live News…..Breaking News!

.

  • बावची विद्यालयाच्या अर्जुन पाटील याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

    परंडा / प्रतिनिधी धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे दि. २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत बावची विद्यालय, परंडाच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला.या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात बावची विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन पाटील याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल…

  • जि. प. उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त 30 शाळांना दोन लाखाची पुस्तक वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व धाराशिवचे नूतन गटशिक्षणाधिकारी अक्षय देशमुख यांच्या स्वागता निमित्त आंबेजवळगा बिट मधील तीस शाळेंना प्रत्येकी सहा हजार पाचशे रुपये प्रमाणे दोन लाखाची पुस्तके मोफत भेट देण्यात आली. हाजी बशीर तांबोळी सर व अखिल शिक्षक संघाने हा अनोखा उपक्रम राबविला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष…

  • मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत द्यावी –

    विभागीय आयुक्तांकडे आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची मागणी धाराशिव / प्रतिनिधी मागील दोन दिवसांत आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण मराठवाड्यातील विविध भागांत दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला. यावेळी खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात हातातून गेल्याचे तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त…

  • समर्थ नागरी सहकारी पतसंस्था यावर्षी सभासदांना देणार ११ टक्के लाभांश – चेअरमन नन्नवरे

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस या वर्षीच्या आर्थिक वर्षात ९३ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्था यावर्षी सभासदांना ११ टक्के दराने लाभांश देण्यात येणार असून संस्थेच्या १०२४ सभासदांना याचा लाभ होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी सांगितले ते संस्थेच्या दि २४ सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील शिवपार्वती…

  • ढोकी येथील जय शिवशंकर गणेश मंडळाच्या शिबिरात १०१ जनांचे रक्तदान

    ढोकी / प्रतिनिधी धाराशिवतालुक्यातील ढोकी येथील जय शिवशंकर गणेश मंडळाच्यावतीने गणेश उत्सवनिमित्त दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १०१ गणेश भक्तांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सदस्य व नागरिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. गणेश मंडळातर्फे रक्तदात्यांना जेष्ट सदस्य आत्माराम काळे व भाऊसाहेब गरड यांच्या हस्ते…

  • परंडा उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

    परंडा / प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालय, परंडा, जि. धाराशिव येथे 23 सप्टेंबर रोजी आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आयुर्वेद या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “आरोग्य हेच खरे धन; आयुर्वेद हा निरोगी जीवनाचा मार्ग!” या संदेशासह भगवान धन्वंतरींचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या…

  • द ग्रैंड पद्माक्ष सोसायटीने घडविला गणेशोत्सवाचा अनोखा ‘सांस्कृतिक महोत्सव’

    धाराशिव / प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटला की भक्ती, आरती आणि सजावट एवढ्यापुरतीच त्याची व्याप्ती मर्यादित राहू नये; तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सहभागी करून घेणारा, संस्कृतीशी नाते जोडणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि नव्या पिढीच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उत्सव असावा, या विचारातून धाराशिव येथील द ग्रँड पद्माक्ष सोसायटीने यंदाचा गणेशोत्सव साकारला आहे. त्यामुळे येथे गणेशोत्सव हा केवळ उत्सव…

  • एमबीबीएस प्रवेशपात्र वडगांव (सि ) येथील विद्यार्थ्यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले गाव, वडगाव (सि) येथील कु. अस्मिता अनिल चादरे, चि. सुमित दत्तात्रय माळी, चि. अभिनव कैलास नाईक आणि चि. अथर्व राजेंद्र मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांनी एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून गावाचा नावलौकिक उंचावला त्याबद्दल पंचायत समिती, धाराशिव येथे त्यांचा पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद (भैय्या) पाटील यांनी…

  • अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 22 वी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

    कर्ज मर्यादा 15 लाख व लाभांश 8% प्रमाणे – चेअरमन हाजी बशीर तांबोळी यांची घोषणा धाराशिव / प्रतिनिधी अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात उत्साहात हाजी बशीर तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेमध्ये अनेक सभासदांचे हिताचे निर्णय एकमताने घेतले गेले. सभासदसाठी कर्जमर्यादा 10 लाखावरून 15 लाख करण्यात येईल, मयत…

  • क्रांती तरुण गणेश मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर

    ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान तेर / प्रतिनिधी क्रांती तरुण गणेश मंडळ, तेर यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रवीण साळुंके, बाबुराव नाईकवाडी, अमोल भातभागे, बबलू भैया भोरे, नवनाथ पसारे, अमोल थोरसडे, राजेंद्र पसारे, मंडळाचे अध्यक्ष सूरज…