सभेत गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संस्थेच्या प्रगतीचा आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. तुकाराम भालके…
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा बसस्थानकात तिकीट आरक्षण कक्ष तसेच २४ तास वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू ठेवावा, अशी ग्रामपंचायतीने केलेली मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाने मान्य करताना अडचणी असल्याचे स्पष्ट केले आहे. बसफेऱ्यांची संख्या, रात्रीच्या वेळेतील प्रवासी वाहतूक आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ यांचा विचार करता २४ तास…
महिला रुग्णालयाच्या डॉ. स्मिता गवळी यांचे मार्गदर्शन धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, उस्मानाबाद (धाराशिव) येथील फार्मसी विभागातर्फे जागतिक फार्मसी दिन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावर्षीच्या फार्मासिस्ट दिनाची संकल्पना “स्वस्थ भारत : प्रतिजैविक प्रतिरोधाचा मुकाबला” (“स्वस्त भारत: कॉम्बॅक्टींग अँटीमायक्रोबीएल रेजिस्टन्स”) ही होती. प्रतिजैविकांच्या अयोग्य…
परंडा / प्रतिनिधी शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात लेझीम पथक व बँडपथकासह मोठ्या उत्साहात गुरुवारी (दि.२४) शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आली. या भव्य दिव्य मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळण करण्यात आली. शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची महाआरती उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आली व महिलांनी १००१ मोदकाचा प्रसाद यावेळी वाटप…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस, धाराशिव येथील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक औषध निर्माता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नितीन गाढवे, औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिफळ तसेच श्रीमती भाग्यश्री माळी, प्राथमिक आरोग्य…
शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धाराशिव / प्रतिनिधी शनिवार संगीत मंडळ, धाराशिव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पं. आप्पासाहेब जळगावकर संगीत समारोहाची उत्साहपूर्ण आणि सुरेल वातावरणात यशस्वी सांगता झाली. शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा अनुभव देणाऱ्या या संगीत मैफलीला धाराशिव शहरातील संगीतप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर्जेदार कलाकारांचे सादरीकरण, समर्थ साथसंगत आणि कलाकारांनी रसिकांशी साधलेला…
सेवा संकल्प अभियानातर्गत प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा धाराशिव / प्रतिनिधी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ( ॲट्रॉसिटी) न्यायालयात तसेच पोलीस विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन पीडितांना वेळेत न्याय मिळणे आवश्यक आहे.न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन पोलीस विभाग आणि सरकारी वकील यांनी परस्पर समन्वयातून त्या दूर कराव्यात.विशेषतः ॲट्रॉसिटीची प्रकरणे फास्ट…
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांचे सर्व तालुक्यांना कार्यवाहीचे आदेश नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र व जीपीएस को-ऑर्डिनेट संकलित करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात जूनपासून आजपर्यंतच्या कालावधीत पर्जन्यातील तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने या तालुक्यामध्ये ट्रिगर -१ प्रथम कळ लागू झाली असल्यामुळे या तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे…
चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी प्रस्तावित भाषणात चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आल्याने खरिप पिके वाया…
धाराशिवचे आठही तालुके ‘ट्रिगर-१’मध्ये महसूल सवलत, कर्ज पुनर्गठन,वसुलीला स्थगिती,परीक्षा शुल्क माफीसह १२ उपाययोजना मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर दोनच दिवसांत शासन निर्णय धाराशिव / प्रतिनिधी पावसाच्या दीर्घ खंडाने हिरवेगार शिवार करपले. सोयाबीनसह खरीप पिकांवर केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया गेला,उसाची वाढ खुंटली आणि पुढचा रब्बी हंगाम कसा घ्यायचा, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची,या चिंतेने शेतकरी…