Live News…..Breaking News!

.

  • परंडा येथे शिवसेना उबाठाच्या वतीने सरकार च्या फसव्या जीआरची होळी

    परंडा / प्रतिनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाय न करता राज्य सरकारने जाहीर केलेला शासन निर्णय केवळ कागदोपत्री आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने परंडा तालुक्यात ‘जीआर होळी आंदोलन’ करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

  • तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उध्वस्त

    संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न; ‘व्होटचोरी’च्या आरोपावर आत्मपरीक्षणाची गरज – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी तीनही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभा केलेला ‘फेक नॅरेटिव्ह’ अक्षरशः उध्वस्त झाला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करून संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अयोग्य…

  • प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा

    जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पाणी मिळावे,यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.मात्र, ही कामे केवळ कागदावरील उद्दिष्टपूर्तीपुरती मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या जल जीवन मिशनच्या कामांना गती देऊन…

  • तीन टर्मनंतर सतीश चव्हाणांसमोर नवे आव्हान ; डॉ.प्रतापसिंह पाटलांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, धाराशिवसह बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर आणि जालना या जिल्ह्यांतील राजकीय समीकरणांवर विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः सतीश चव्हाण यांच्या संभाव्य राजकीय वाटचालीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार गटाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचे आव्हान उभे राहू शकते का, याबाबत…

  • YCC मित्र मंडळाची ४६ वर्षांची परंपरा कायम!

    गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘अघोरी शो’ने येरमाळकरांचे वेधले लक्ष! येरमाळा / प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या उत्साहात येरमाळा येथील YCC मित्र मंडळाने तब्बल ४६ वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले. मिरवणुकीदरम्यान मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अघोरी शो’ने येरमाळकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गेल्या अनेक दशकांपासून YCC मित्र मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक…

  • पिकाच्या तांत्रिक उत्पादनातील त्रुटी दूर करा -पीक कापणीलाच प्राधान्य द्या ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निदर्शनास आणून दिलेल्या तांत्रिक तफावतीच्या मुद्द्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करताना तंत्रज्ञानावर आधारित ‘येस-टेक’ (YES-TECH) पद्धतीमुळे प्रत्यक्ष शेतातील उत्पादन आणि तांत्रिक अंदाजात मोठी तफावत निर्माण होत आहे. हा मुद्दा आपण राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. याच मुद्द्याची आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने…

  • धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी – दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

    धाराशिव / प्रतिनिधी पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.येणाऱ्या काळात जनावरांच्या गोठ्यात चारा कमी पडू नये आणि उपलब्ध चाऱ्यासाठी पशुपालकांची धावपळ होऊ नये,यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.तसेच…

  • एनव्हीपी शुगर तृतीय गळीत हंगामात 3100/- ऊस दर देणार

    चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी प्रस्तावित भाषणात चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आल्याने खरिप पिके वाया…

  • खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करा

    जिल्हाधिकारी श्री.पुजार यांचे सर्व तालुक्यांना कार्यवाहीचे आदेश नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र व जीपीएस को-ऑर्डिनेट संकलित करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात जूनपासून आजपर्यंतच्या कालावधीत पर्जन्यातील तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने या तालुक्यामध्ये ट्रिगर -१ प्रथम कळ लागू झाली असल्यामुळे या तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे…

  • रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०२ चा बॉयलर व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता परिवारातील रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०२, रोशनपुरी, ता. माजलगाव, जि. बीड येथे गळीत हंगाम २०२६–२७ च्या पार्श्वभूमीवर बॉयलर व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला. युनिटचा हा चौथा यशस्वी गळीत हंगाम आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवर दांपत्यांच्या शुभ हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी…