Live News…..Breaking News!

.

  • वकील नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी येथील वकील नागरी सहकारी पतसंस्थेची 24 वी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा शहरातील शिवगौरी फंक्शन हॉल धाराशिव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत जिल्हा विधिज्ञ मंडळ, धाराशिवचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे, चेअरमन ॲड. राजेंद्र धाराशिवकर संचालक ॲड रामचंद्र गरड , ॲड. रमेश वट्टे ॲड. संजय बिराजदार तसेच संस्थेच्या सचिव माधुरी जाधव यांनी प्रथम…

  • दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुली तात्काळ थांबवा – काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंनिंबाळकर यांची मागणी…

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी व सहकारी बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) तसेच विविध फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यावतीने…

  • भटके-विमुक्त कागदपत्रे अभियानाला परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; तीन दिवसांत ४७१ सेवा व कागदपत्रांची कार्यवाही

    परंडा / प्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ घेण्याची इच्छा आहे,मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची,अर्ज कुठे करायचा, कोणत्या विभागाशी संपर्क साधायचा,अशा अनेक अडचणींचा सामना भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना करावा लागतो.ही अडचण दूर करून त्यांना थेट शासकीय यंत्रणेशी जोडण्यासाठी सेवा संकल्प अभियान व राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – प्रमाणपत्र अभियान २०२६’ ला परंडा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

  • आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला होता अग्निवीरांचा प्रश्न; सरकारकडून नोकरीत १० टक्के समांतर आरक्षण

    परीक्षा, प्रशिक्षणातून सूट; वयोमर्यादेत चार वर्षांची सवलत धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्रातील सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला होता. अग्निवीरांना शासकीय सेवेत समांतर आरक्षण देण्याची तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस योजना आखण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी…

  • श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी येथील श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साही वातावरणात स्वयंवर मंगल कार्यालय, धाराशिव येथे संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. बी. जाधव, माणिकराव अष्टेकर, ज्येष्ठ संचालक आर. बी. झेंडे, माजी गटशिक्षणाधिकारी माणिकराव मोकाशे, प्रा. अभिमान हंगरगेकर,…

  • उमरगा तालुक्यात पीकांच्या पंचनाम्यास वेग

    मुरूम / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. उमरगा तालुक्यातील सर्व गावामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाल्याने तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे सध्या महसूल प्रशासनाकडून वेगाने सुरु आहेत. तालुक्यातील बेळंब येथे शेतकरी बांधवासमक्ष शेतातील सोयाबीन, तूर, उडीद या पिकाचे पंचनामे करण्यासाठी बेळंब येथील तलाठी सुदेश होनकळस, कृषी सहायक व्ही साखरे, ग्रामसेवक आर व्ही…

  • शिस्तबद्ध गणेश विसर्जनासाठी श्री गणेश तरुण मंडळातर्फे शहर पोलीसांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी श्री गणेश नगर तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘श्री रामायण’ या धार्मिक व सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित भव्य-दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. श्री गणेश नगर, म्हसोबा चौक येथून उत्साहात निघालेली ही मिरवणूक प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गावरून शांतता, शिस्त व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस…

  • बावची विद्यालयात NEET/JEE स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

    परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांना NEET/JEE या स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने NEET/JEE स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर मुटकुळे, संस्थापक अध्यक्ष, आचार्य अकॅडमी, बारामती यांनी विद्यार्थ्यांना NEET व JEE परीक्षेचे स्वरूप, तयारीची योग्य पद्धत, अभ्यासाचे…

  • उद्योजक रामभाऊ जगदाळे व सोहम धनंजय सावंत यांचा डोमगाव येथे सत्कार .

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पाचा मत्स्यबीज व्यवसाय ठेका (टेंडर) शंकरराव पाटील या संस्थेस मिळाला असून , मत्स्य बीज सोडण्यासाठी रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी पुणे येथील उद्योजक रामभाऊ जगदाळे यांचे डोमगाव येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी दिपक गायकवाड परिवाराची भेट घेतली यावेळी गायकवाड परिवाराकडून उद्योजक रामभाऊ जगदाळे व युवा नेते सोहम धनंजय…

  • सिद्धार्थ शिंगाडे यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय कला पुरस्कार जाहीर

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ चे माजी विद्यार्थी सिद्धार्थ शहाजीराव शिंगाडे यांना भारत सरकार ललित कला अकादमीच्या वतीने राष्ट्रीय ललित कला पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सदरील पुरस्कार वृक्ष या शिर्षकाच्या कलाकृतीच्या चित्रास प्राप्त झाला असून सदरील पुरस्काराचे वितरण राजधानी दिल्ली येथील रवींद्र भवन येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म,भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री…