Live News…..Breaking News!

.

  • श्री सत्यपुरी (तेर ) पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुजारी परिवार व समस्त भजनी मंडळ तेर व पंचक्रोशी परिसर भजनी मंडळ तीर्थक्षेत्र सत्यपुरी यांच्यावतीने प्रथमच श्री सत्यपुरी ( तेर ) पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ झाला. सत्यपुरीच्या ( तेर ) पंचक्रोशी मध्ये सकल ऋषी मुनीजन व अखिल देवता वन वृक्षवल्ली ,पक्षी, मृतीका व पाषाण खडकाच्या रूपाने राहतात व…

  • युपीआयवर कर लादणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा धाराशिवच्या व्यापाऱ्यांनी केला निषेध

    काळया फिती लावून पाळला ‘नो युपीआय डे’ धाराशिव / प्रतिनिधी केंद्रातील तुघलकी सरकारने युपीआयवर लादलेल्या (एमडीआर) कराच्या निर्णयाचा धाराशिव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला. शुक्रवारी सर्व क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी काळया फिती लावून ‘नो युपीआय डे’ पाळला. व्यापाऱ्यांची छळवणूक करणारा हा तर जिझीया कर आहे. तो त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने…

  • रुपामाता अर्बन मुख्य शाखेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता अर्बन मुख्य शाखा, धाराशिव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे स्मरण करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. बोधले, प्रशासकीय अधिकारी…

  • तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आ. राणादादांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    धाराशिव / प्रतिनिधी अत्यल्प पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, पशुधनासाठी चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.अशा कठीण काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून गरजू शेतकरी व कुटुंबांना काही स्वरूपात दिलासा देता येईल का, याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना मंदिर…

  • गांधी जयंती निमित्त श्रीकृष्ण गणेश मंडळाच्यावतीने स्वच्छता उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा, येथील हे मंडळ स्थापनेपासुन सामाजिक कार्यात अग्रेसर असुन हे मंडळ नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त मंडळाच्यावतीने गवळी वाडा येथील श्री गणेश मंदिरात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातलाई…

  • शारदीय नवरात्र उत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे कडून केली पाहणी

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यभरातून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत असल्याने भाविकांना सुरळीत…

  • निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी विहित वेळेत पार पाडा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक धाराशिव / प्रतिनिधी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि विहित वेळेत पार पाडण्यासाठी विविध कक्षांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि वेळेत पार पाडाव्यात,असे निर्देश…

  • शेतकऱ्यांच्या विमा हक्कासाठी मा.आमदार ज्ञानराज चौगुले सर्वोच्च न्यायालयात

    मुरूम / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार ज्ञानराज चौगुले हे शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विमा हक्काच्या प्रकरणासाठी आज, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिले होते . बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मा.आमदार चौगुले सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. उपलब्ध प्रकरणाच्या नोंदीनुसार हे प्रकरण विमा…

  • गोमांस तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

    २७ लाख ६२ हजार रू. किमतीचा मुददेमाल जप्त १३ गोमाताला दिले जीवनदान धाराशिव / प्रतिनिधी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.३०/०९/२०२६ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनिय बातमी मिळाली की, परंडा येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते मांस दोन पिकप मध्ये भरून व एका आयशर टेम्पो मध्ये कत्तलीसाठी…

  • बाळू मामाच्या नावाने चांगभले’ मालिकेतील ‘तात्या’ अक्षय टाक यांचा मा. आ. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    परंडा / प्रतिनिधी सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता प्रामुख्याने कलर्स मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘बाळू मामाच्या नावाने चांगभले’ या मालिकेतील ‘तात्या’ या भूमिकेसाठी ओळखले जाणारे व ‘तात्याची पैठणी’ फेम अक्षय टाक आणि तारक ‘मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील अभिनेत्री अंकिता बुरांडे- टाक यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट…