Live News…..Breaking News!

.

  • कंडारी येथील भैरवनाथ मंदीर चोरीचा तपास करून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा .

    परंडा / प्रतिनिधी मंदीर चोरी प्रकरणी तीन दिवस झाले तरी चोर सापडत नसले च्या निषेधार्थ कंडारी ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . याबाबत दि ३ रोजी ऑक्टोबर रोजी तहसीलदार परंडा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा निषेध व दोषींवर तात्काळ कठोर…

  • तुळजापूर शहराच्या वीजपुरवठ्याला मिळणार मोठा दिलासा

    पाचुंदा वीज केंद्रात 5 MVA ऐवजी आता 10 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर! तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहराला वीजपुरवठा करणाऱ्या लातूर रोड येथील पाचुंदा वीज केंद्रामध्ये यापूर्वी 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यरत होता. त्यामुळे शहरातील वाढत्या वीज मागणीच्या तुलनेत क्षमता अपुरी पडत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेजमध्ये चढ-उतार होणे, कमी वीजदाब मिळणे तसेच वीज ट्रिप होणे…

  • संकटाच्या काळात महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी — आ. राणाजगजितसिंह पाटील

    लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद लोहारा / प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीच्या अनुशंगाने संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. व संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं, ही माझी जबाबदारी! आहे, असे मत भाजपाचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. खरीप हंगामातील पीक नुकसान…

  • रुपामाता अर्बन मुख्य शाखेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता अर्बन मुख्य शाखा, धाराशिव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे स्मरण करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. बोधले, प्रशासकीय अधिकारी…

  • युपीआयवर कर लादणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा धाराशिवच्या व्यापाऱ्यांनी केला निषेध

    काळया फिती लावून पाळला ‘नो युपीआय डे’ धाराशिव / प्रतिनिधी केंद्रातील तुघलकी सरकारने युपीआयवर लादलेल्या (एमडीआर) कराच्या निर्णयाचा धाराशिव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला. शुक्रवारी सर्व क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी काळया फिती लावून ‘नो युपीआय डे’ पाळला. व्यापाऱ्यांची छळवणूक करणारा हा तर जिझीया कर आहे. तो त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने…

  • महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात अभिवादन;

    300 विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती जिल्हा काँग्रेस भवन, धाराशिव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त…

  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १००% पंचनामे करा; आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे १००% नुकसान झाले असून सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांमध्ये कागदपत्रांची कोणतीही अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे खरीप व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शासकीय पातळीवर नुकसानग्रस्त…

  • परंडा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली ; सिनाकोळेगाव प्रकल्पात अवघा मायन्स – २५ . o % पाणीसाठा .

    तहसिलदार निलेश काकडे यांनी प्रकल्पाची केली पाहणी . पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात यंदाच्या वर्षी दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अतिशय तीव्र होत चालली असून सध्याची परिस्थिती अधिक गंभीर होत आहे .दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतीसोबतच पशुधनाला बसत आहे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने तालुका भरात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे .तर…

  • पदवीधर मतदार भाकरी फिरवण्याच्या तयारीत, आ. सतीश चव्हाण यांच्या विषयी नाराजीचे वातावरण

    भाजपा आणि महाविकास आघाडीने प्रबळ उमेदवार दिल्यास परिवर्तन अटळ धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची सध्या निवडणूक पक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मागील तीन टर्म या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहिलेले व पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी ईच्छुक असलेले आ. सतीश चव्हाण यांच्या विषयी पदवीधर मतदारांमध्ये…

  • खानापूरच्या तरूण शेतक-याची नापिकीला कंटाळुन आत्महत्या

    संतप्त नातेवाईकांनी आणला मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या खानापूर येथील एका ३५ वर्षीय तरूण शेतक-याने कर्ज व नापिकीला कंटाळून गुरूवार दि. १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दयानंद संतराम राठोड असे या आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकानी व…