Live News…..Breaking News!

.

  • पंचायत समिती उपसभापती प्रमोद पाटील यांना मातृशोक

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि.) येथील रहिवाशी तथा धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील यांच्या मातोश्री कस्तुरबाई (काकी) भाऊसाहेब पाटील (80) यांचे रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उपचारादरम्यान धाराशिव येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. कस्तुरबाई पाटील या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांचे…

  • अपप्रचाराला उत्तर नको; कामातून उत्तर द्या – खासदार ओमराजे निंबाळकर

    तुळजापुरात मोफत सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद तुळजापूर / प्रतिनिधी आपल्या बाबतीत अपप्रचार करणाऱ्या असंतुष्टांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा सकारात्मक कामासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. माणूस हा त्याच्या कामातून ओळखला जावा, याच उद्देशाने आरोग्यविषयक उपक्रम हाती घेतले आहेत,” असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला. शिवसेना, मृणाली फाऊंडेशन तुळजापूर, शिवसेना डॉक्टर सेल…

  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने अर्ज भरणार डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यातीलदुष्काळाचे तीव्र संकट, शेतकऱ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण आणि रोजगाराचे गंभीर प्रश्न असताना मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, कोणताही गाजावाजा किंवा शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साध्या पद्धतीने अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधव अडचणीत आहेत,…

  • आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेला शनिवारी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे उत्साहात प्रारंभ झाला. धाराशिव झोनअंतर्गत ३ व ४ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धा होत असून, विविध महाविद्यालयांतील किमान २१० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब…

  • श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेस शनिवारी प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या. मंचकी निद्रेच्या पार्श्वभूमीवर सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवींचा पलंग घासून-पुसून स्वच्छ धुऊन घेतला. तसेच आराधी महिलांनी मंचकी निद्रेसाठी आवश्यक असलेल्या गाद्यांमधील कापूस पिंजून घेतला. धार्मिक आख्यायिकेनुसार,…

  • जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत डकवाडी येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग संपन्न

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत जगन्नाथ पुनगडे यांच्या गट क्रमांक ४३ मधील क्षेत्रात पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजू कांबळे ,अप्पर तहसीलदार श्रद्धा चव्हाण , पंचायत समिती सभापती गोकर्णा कदम , तालुका कृषी अधिकारी सोनाली गादेकर , विस्तार अधिकारी संजय ढाकणे,…

  • धनंजय मुंडे यांचे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!

    टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.…

  • प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

    ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान धाराशिव / प्रतिनिधी एल-निनोच्या प्रभावामुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात एका शासकीय अधिकाऱ्याची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करावी. तसेच जिल्हास्तरावर ‘दुष्काळ नियंत्रण व तक्रार निवारण कक्ष’ (वॉर रूम) स्थापन…

  • *ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांवर स्वतंत्र डीटीसी (DTC) उपलब्ध नसल्याने तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा एजी (AG) फिडरवरून होत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनांना…

  • रुईभर येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगास जि. प. सीईओ प्रियवंदा म्हाडदळकर यांची उपस्थिती

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनाची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यासाठी मौजे रुईभर, तालुका धाराशिव येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. या पीक कापणी प्रयोगास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांनी उपस्थित राहून पाहणी केली. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष नलावडे , जिल्हा कृषी…