Live News…..Breaking News!

.

  • साडेसांगवीत आशेचा दिवा प्रज्वलित, आपत्तीच्या छायेतून नव्या उजेडाकडे वाटचाल !पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    पूरग्रस्त साडेसांगवी ग्रामस्थांसोबत साजरी केली दिवाळी धाराशिव / प्रतिनिधी “आपत्तीने भूमी हादरली,पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही” या वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचं सार दडलं आहे.गेल्या काही महिन्यांपासून पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या भूमीत आज पुन्हा आशेचे दिवे पेटले आहेत. गावकऱ्यांशी संवाद साधताना परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी आज सायंकाळी…

  • जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये विशेष ग्रामसभा नुकसानीची माहिती संकलनास सुरुवात

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान केंद्र शासनाच्या SDRF/NDRF निकषांनुसार तपशीलवार प्रस्तावासहित सादर करणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने,जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांतील शेतीपिके आणि सार्वजनिक मालमत्ता मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे.या नुकसानीची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व…

  • देशी खेळास व कुस्तीला शासनाने प्रोत्साहन द्यावे – माजीमंत्री मधुकरराव चव्हाण

    नळदुर्ग / प्रतिनिधी शासनाने कुस्तीपट्टूंना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक त्या सुविधा देणे व त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे असे मत माजीमंत्री तथा माजी आमदार मधुकराव चव्हाण यांनी आज नळदुर्ग येथील महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने व येथील बालाघाट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने…

  • कळंब पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्यांना मिळणार निवडणूकीत संधी

    कळंब / प्रतिनिधी नगरपालिकेनंतर आता पंचायत समिती आरक्षण सोडतीने कळंब तालुक्यातील राजकीय चित्रच पालटले आहे. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या सोडतीत १६ गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. चिठ्ठी पद्धतीने झालेल्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी संजय पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हेमंत ढोकले आणि गटविकास अधिकारी विनोद जाधव उपस्थित होते.या सोडतीनंतर अनेक प्रस्थापित नेत्यांचे…

  • मराठी भाषेची अभिजातता आता आपल्या खांद्यावर — युवराज नळे

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार कांचन जाधव आणि व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक युवराज नळे, प्रा रवी सुरवसे, प्रा प्रशांत गुरव उपस्थित होते. याप्रसंगी…

  • आ. प्रवीण दरेकर यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटसह २५४ कुटुंबांना प्रत्येकी दोन हजाराची मदत

    परंडा / प्रतिनिधी विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त वाघेगव्हाण (ता. परांडा) येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन या संकटकाळात त्यांना जीवनावश्यक वस्तुंचे किट व २५४ कुटुंबाना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील ,मा.आमदार सुजितसिंह ठाकूर आदि उपस्थित होते.मुंबईहून आपल्या…

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली ५५ जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

    धाराशिव / प्रतिनिधी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार आज धाराशिव येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा परिषदेचे निवडणूक विभागनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून आयोजित सभेत निश्चित करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

  • स्वयंसेवकानी पंच परीवर्तन आचरणात आणावे – संजय अग्रवाल

    तेर येथे संघ स्वयंसेवकांचे पथ संचलन तेर ( म. नेता ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पंच परीवर्तन आचरणात आणावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर विभागाचे विभाग संघचालक संजय अग्रवाल यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने गावातील मुख्य रस्त्यावरून पथ संचलन काढून विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संघाचे…

  • पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे – गफार काझी

    ढोकी ( म. नेता ) छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात धाराशिव जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करून सहभागी व्हावे तसेच यासाठी काही अडचण आल्यास संपर्क करावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गफार काझी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या सन २०२६ मध्ये होणाऱ्या…

  • जिल्हयातील युवक-युवतींसाठी दर तीन महिन्याला रोजगार मेळाव्याचे आयोजन – आ. राणाजगजितसिंह पाटील

    २८ आँक्टोंबरला पहिल्या मेळाव्याचे आयोजन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावे आयोजित करण्याचा आपला संकल्प असून, त्याची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून होत आहे अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धाराशिव येथे दिनांक २८ ऑक्टोबर…