Live News…..Breaking News!

.

  • खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा –आ. कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी.

    धाराशिव / प्रतिनिधी सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण यानुसार वाढीवची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे. जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा…

  • अतिवृष्टीग्रस्त महिलांना विमा क र्मचारी सेनेच्या वतीने आ. कैलास पाटील यांच्या हस्ते वाटप

    कळंब / प्रतिनिधी अतिवृष्टीचे संकटं आणि उपजीविकेशी झुंज देत आयुष्याचा गाडा ओढणाऱ्या विधवा अल्पभूधारक आणि आपत्तीग्रस्त कळंब तालुक्यातील महिलांना मुंबई येथील भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या माध्यमातून या संघर्षशील मातृशक्तींना हरभरा बियाणे आणि दिवाळीसाठी मिठाईचे वाटप करण्यात आले. कळंब पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमात आमदार कैलास पाटील,कर्मचारी सेनेचे संजय डफळ, विनायक रणदिवे, आनंद कांबळी,…

  • पूरग्रस्तांना २० क्विंटल किराणा साहित्य आणि रोख पन्नास हजाराची मदत

    परंडा / प्रतिनिधी तालुक्यातील बावची येथे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी देवर्डा ग्रामस्थ आणि विविध संस्थांनी एकत्र येत मानवतेचा सुंदर संदेश दिला आहे. शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला देवर्डा गावातील ग्रामस्थ,मित्र, सहकारी, नातेवाईक, शेतकरी जागर मंच, पावर लाईन जिमचे सहकारी, स्व. नामदेवराव घोगरे विद्यालय* तसेच जे. आर.…

  • शेतक-यांच्या अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनास आ. प्रवीण स्वामी यांचा पाठिंबा

    धाराशिव / प्रतिनिधी शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखालील माकणी धरण उंचीवाढ विरोधी जनआंदोलनाला आमदार प्रवीण स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणीवर असून बेलकुंड उपसा सिंचन योजनेसाठी माकणी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचालींना वेग आला असून, राज्य जलसंपदा विभागाने २२ ऑगस्ट २०२५ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या…

  • तुळजापुरात ५ हजार कुटुंबाना विनोद गंगणे यांंच्याकडून फराळाचे साहीत्य वाटप

    तुळजापूर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये समाजसेवेच्या परंपरेला उजाळा देत युवा नेते विनोद (पिटू भैय्या) गंगणे यांच्या वतीने दिवाळीपूर्वी गरजू व कष्टकरी कुटुंबांना शिधा किट वाटप करण्यात आले.हा उपक्रम शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी महंत तुकोजीबुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमास आ. राणाजगजितसिंह पाटील , हैद्राबादचे माजी आमदार रेड्डी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे,…

  • पालिका निवडणूकीत महाविकास आघाडीस प्राधान्य, पण स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज – रुषीकेश मगर

    तुळजापूर  / प्रतिनिधी येत्या तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर युती झाली तर आघाडीला प्राधान्य, मात्र जर ती शक्य झाली नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वबळावर निवडणूक लढविण्यास पूर्णपणे तयार आहे, असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे  नेते रुषीकेश मगर यांनी केले. शिवसेना तुळजापूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नगरपरिषद निवडणूक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या…

  • शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणारआमदार पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात १०८ फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अंगाने परिपूर्ण असावे यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून प्रतिकृतींचे आणखी बारकावे तपासले जाणार आहेत. राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर करण्यात आलेल्या एकूण १४ प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे.धार्मिक आणि प्राचीन इतिहास…

  • नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या धाराशिव जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. तसेच मुंबई येथे संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार्‍या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार  धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके ,…

  • पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागी व्हावे – भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून राज्याच्या धोरणनिर्मितीत आपला थेट वाटा उचलावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार…

  • वेलनेस  कॉलेज ऑफ  फिजिओथेरपीच्या डॉ. पूजा आचार्य  यांना डायनॅमिक फिजिओ अवार्ड प्रदान  

    धाराशिव / प्रतिनिधी व्हीपी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील वेलनेस काँलेज ऑफ फिजिओथेरपीच्या  प्राचार्या डॉ. पूजा आचार्य यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, लातूर यांच्या तर्फे आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोथेरपी परिषद – ELECTROCON-25 मध्ये शैक्षणिक तसेच क्लिनिकलकार्यातील प्रभावी योगदानाबद्दल Dynamic Physio Award” हा पुरस्कार प्रदानकरून गौरविण्यात आले.या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व मार्गदर्शक करण पाटील यांचे सततचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हेच प्रेरणास्थान ठरले असे डॉ. पूजा आचार्य  यांनी सांगितले. या परिषदेत वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या  प्रथम वर्षाचा संविधान कांबळे याने  सोलो डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक  पटकाविला तर द्वितीय वर्षातील विकास पवार याने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. प्रतापसिंह  पाटील , मार्गदर्शक करण पाटील  व व्यवस्थापक अमरसिंह कवडे यांनी डॉ. पूजा आचार्य व स्पर्धकांचे  अभिनंदन केले