Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव शहरातील रस्त्याच्या कामांना १८ महिने उशीर का ?

    एसआयटी’ चौकशी आणि खुल्या चर्चेची खा.ओमराजे व आ.कैलास पाटील यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील महत्त्वाच्या ५२ रस्त्यांसाठी मंजूर असलेल्या सुमारे १४० कोटी रुपयांच्या कामांमध्ये १८ ते १९ महिन्यांचा विलंब झाल्याने महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षावर थेट गंभीर भ्रष्टाचाराचे आणि राजकीय दबावाचे आरोप केले आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी संयुक्त पत्रकार…

  • लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड – भाजपा प्रवक्ते ऍड नितीन भोसले

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहर नगरोत्थान योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी संभाजीनगरच्या आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांचा तिळपापड सुरू आहे. त्यासाठीच वारंवार यंत्रणेवर तुम्ही दबाव आणला. या दबावामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी यावर कांहीही कारवाई केली नाही. परिणामी इतके दिवस काम रखडले. असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यावर भाजपाचे…

  • धाराशिव येथे मंगळवारी भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावापाचवी ते पदवीधर उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी – शंतनू पायाळ

    धाराशिव / प्रतिनिधी सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत पुष्पक मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असल्याची माहिती आयोजक तथा भाजपाचे युवा नेते शंतनू पायाळ…

  • तुळजापूर नगर पालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार – खा. ओमराजे निंबाळकर

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल असा आत्मविश्वास शिवसेना (उबाठा) चे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत व्यक्त केला . आज शनिवारी तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख…

  • अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल — जनसेवकाच्या पुढाकाराने उजळल्या गल्लीबोळा!

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापुर शहरातील प्रभाग क्र. ९ मधील वडार गल्ली, वासुदेव गल्ली, जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरासह भक्तनिवास परिसरातील रस्ते अनेक दिवसांपासून अंधारात बुडाले होते. स्ट्रीट लाईट बंद असल्याने भाविक आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत होता. या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांच्या हालचालीही वाढल्या होत्या. या समस्येची दखल घेऊन जनसेवक अमित (भैय्या) कुतवळ यांनी पुढाकार घेत ६० पोलांवर नवीन लाईट बसवून परिसर…

  • संत मीरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डाँ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

    परंडा / प्रतिनिधी शालेय क्रीडा स्पर्धा-2025 सध्या अंतिम टप्प्यात असून रंगात आलेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत मीरा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. लातूर येथे झालेल्या शालेय विभागीय आर्चरी स्पर्धा व आर्चरी असोसिएशन तर्फे धाराशिव येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी निवड चाचणी या दोन्ही स्पर्धेत शाळेची विद्यार्थ्यांनी कु. प्रतिभा…

  • निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का असेना पण, सरका रला शहाणपण – महाविकास आघाडीची बोचरी टीका

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील दिड वर्षांपासून रखडलेल्या 140 कोटी रस्ते कामाची कार्यारंभ आदेश निघाले. भाजपची मंडळी याचा गाजावाजा करत आहेत पण प्रक्रिया एवढे दिवस का थांबली यावरही त्यांच्या नेत्यांनी एकदा बोलाव असे आव्हान महाविकास आघाडीने भाजपला दिले आहे.महाविकास आघाडीकडून तीनही पक्षाचे शहरप्रमुख तथा अध्यक्ष यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिले आहे. या पत्रकात पुढे म्हंटले…

  • धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशजनतेच्या साठ कोटींची बचत!लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनआमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता…

  • नळदुर्ग पालिकेवर भाजपा चा झेंडा फडकविण्यासाठी कर्यकर्त्यांनी एकदिलांनी कामाला लागावे – आ. राणाजगजितसिंह पाटील

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून एकादिलाने कामाला लागावे व जनतेपर्यंत शहरातील केलेली विकास कामांची माहिती पोहोचवावी असे आवाहन तुळजापूर तालुक्याचे भाजप आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केले. येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे, त्यानुसार विविध पक्षाच्यावतीने जनसंपर्क कार्यालयचे उदघाट्न करण्यात येत आहे, यामध्ये कांग्रेस,…

  • श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी येथील धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष सौ.श्वेताताई सागर दुरुगकर यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला आहे.  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.युवती नेत्या सौ.श्वेताताई सागर दुरुगकर यांचे सामाजिक क्षेत्रत तसेच युवतीसाठी मोठे काम आहे. त्यांनी वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत…