परंडा / प्रतिनिधी येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे भारताचे पहिले गृहमंत्री व लोहपुरुष या उपाधीने गौरविलेले सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली . महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले .याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय…
धाराशिव / प्रतिनिधी भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतीक, लोहपुरूष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमीत्त धाराशिव शहरात भाजपाच्या वतीने ” रन फाँर युनिटी ” अंतर्गत एकता दौड चे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथ शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला…
ढोकी ( म.नेता ) धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील गुणवंत सुतार यांची ढोकी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल,गावातील ज्येष्ठ नागरीक व मित्र परिवार यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील राजकीय होणाऱ्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्रिंबक पोतदार, मोहन पोतदार, नंदू कंदले,राजाभाऊ सुतार, राजेंद्र लोहार,संजय सुतार, बालाजी देशमुख, भैरू माळी,श्रीकांत परिट,दिनेश पांचाळ,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
धाराशिव / प्रतिनिधी उबाठाचे आमदार-खासदार यांच्या तोंडी जी भाषा होती त्याच भाषेत आमच्या मित्र पक्षाचे पदाधिकारीही आता बोलू लागले आहेत. त्यामुळे दोघांचीही स्क्रिप्ट एकाच लेखकाने लिहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. असे मत भाजपाचे प्रवक्ते अँड नितीन भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकात व्यक्त केले. या पत्रकात पुढे म्हंटले आहे की , पत्रकार परिषद घेणारे आमचे मित्र पक्षाचे…
धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधे तेरणा ट्रस्टचे विश्वस्त आणि “मित्रा”चे उपाध्यक्ष आणि तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि स्टाफ यांनी उस्फूर्तपणे यावेळी रक्तदान केले. यावेळी विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . प्रत्येक…
तेर ( म. नेता ) भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी युवकांचे कुशल संघटन करावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रतिक रोचकरी बोलत होते.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे धाराशिव तालुकाध्यक्ष…
तुळजापुर / प्रतिनिधी सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने आज बुधवारी सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. आज सायंकाळी लातूर येथे नाटकाचा प्रयोग असल्याने नाटकातील सर्व कलाकार श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरात दाखल झाले होते. नाटकातील प्रमुख कलाकार सुनील बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, अतिशा नाईक,…
धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सचिव आ. वरुण सरदेसाई, खा. ओमराजे निंबाळकर,आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना राज्य उपसचिव मनिषाताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा युवती सेना जिल्हा प्रमुख जिल्हा युवतीधिकारी पदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव चे संस्थापक अध्यक्ष अरविंददादा गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवारी धाराशिव येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन बोरगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला . या प्रसंगी ॲड. निलेश बारखडे पाटील संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव, मा. अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव, तसेच…