Live News…..Breaking News!

.

  • संत मीरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य संतोष भांडवलकर यांना ‘स्टार एज्युकेशन २०२६’चा बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड.

    परंडा / प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत संत मीरा पब्लिक स्कूल, परंडाचे प्राचार्य संतोष सोपान भांडवलकर यांची ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स-२०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती . त्यांना ‘ बेस्ट प्राचार्य ‘ – स्टेट बोर्ड धाराशिव या श्रेणीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील NESCO, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव पूर्व येथे ६…

  • जनता सहकारी बँकेकडून दुष्काळग्रस्तासाठी 36 लाखाची मदत

    धाराशिव / प्रतिनिधी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात व कर्नाटकात अत्यल्प पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजूर यांचा खरीप हंगाम हातचा गेल्याने व पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईमुळे जनावरांचा चारा – पाण्याचा प्रश्न यांचबरोबर महागाई आणि तरुणापुढील बेरोजगारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासद, ठेवीदार व कर्जदार यांना दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने बँकेच्या नफ्यातून उभारलेल्या…

  • आयुक्त स्तरावर शेतकऱ्यांविरोधात निकाल वाढले

    राज्यातील खासगी सावकारी प्रकरणांचा फेरआढावा घ्या;बँकांनीही कर्जवाटपात शासनाचे नियम पाळावेत – आ. कैलास पाटील धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील खासगी सावकारी प्रकरणांमध्ये जिल्हा निबंधक आणि विभागीय सहनिबंधक स्तरावर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागत असताना, सहकार आयुक्त स्तरावर मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकरणांचा फेरआढावा घ्यावा,…

  • जि. प. सीईओनी घेतला विभागनिहाय कामांचा सविस्तर आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांची विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मागील आठवड्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच विविध योजना, उपक्रम, प्रलंबित कामे, नागरिकाभिमुख उपक्रम आणि आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.…

  • कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा

    ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळताना निर्माण झालेल्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी पुणे येथे सहकार आयुक्त व…

  • प्रतिकूल परिस्थितीतच दर्जेदार साहित्यमूल्य निर्मितीचे बिजं असतात – प्रा. डॉ. शेषराव मोहिते

    तुळजापुरात जागर साहित्य पुरस्कारांचे वितरण तुळजापूर / प्रतिनिधी मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूरच्या वतीने जागर साहित्य पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यात प्रा. डॉ. शेषराव मोहिते, प्रा. सुरेश आडके, यामिनी दळवी यांना जागर साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तुळजापूरमध्ये रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी हॉटेल स्कायलँड, बँक्वेट हॉल येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला.…

  • जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा पाणी उपलब्धतेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. उपलब्ध जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation) कमी करून पाण्याची बचत करणे हे खरे तर मोठे आव्हान आहे. जलाशय, सिंचन तलाव, पाझर तलाव आणि अन्य योग्य जलसाठ्यांवर Evaporation-Suppressing Monolayer (ESM) अर्थात बाष्पीभवन-प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह…

  • दुष्काळी परस्थितीच्या पार्श्वभूमीवर जि प अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याशी शेतकऱ्यांची चर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा करून विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, पिकांची परिस्थिती, पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना आवश्यक मदत व तातडीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अर्थ व…

  • येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरु

    येरमाळा / प्रतिनिधी राज्यातील प्रसिद्ध आराध्य दैवत,भाविकांचे श्रद्धास्थान श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सुरवात रविवार (दि 11) ऑक्टोंबर पासुन मोठ्या उत्साहात घटस्थापनेने होणार आहे. नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोई – सुविधा पुरवण्यासाठी मंदिरदेवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवीच्या मंदिराची रंगरंगोटी काम अंतिम टप्प्यात आहे. रविवार ( दि. 11) ऑक्टोबर अश्विन शुद्ध…

  • लहुजी सेनेच्या पुरस्कारांचे मा. आ. ठाकूर यांच्या हस्ते वितरण

    अविनाश भोसले यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान तेर / प्रतिनिधी – आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धाराशिव येथील आर्यन फंक्शन हॉलमध्ये आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व सोशल मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अविनाश ज्योतिराम भोसले यांना ‘संघर्ष योद्धा समाजरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान…