Live News…..Breaking News!

.

  • महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डाँ प्रतापसिंह पाटील यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी डाँ प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती झाल्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, माजी नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या हस्ते जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने डाँ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरील मान्यवरांसह…

  • युवानेते शरण पाटील यांनी घेतली मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट

    परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा.आमदार सुजितसिंह ठाकूर यांची माजी मंत्री तथा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मा.बसवराज पाटील यांचे चिरंजीव युवा नेते शरण पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भेट घेतली. यावेळी परंडा भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे,…

  • जालना येथील विभागीय गझल संमेलनात धाराशिव च्या स्नेहलता झरकर – अंदुरे यांना अध्यक्षपदाचा मान

    संमेलनात सुनिता गुंजाळ, मीना महामुनी यांचा समावेश धाराशिव / प्रतिनिधी गझल मंथन साहित्य संस्थेच्या नुकत्याच झालेल्या जालना  येथील विभागीय गझल संमेलनात धाराशिव च्या स्नेहलता झरकर- अंदुरे यांना मुशायरा अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आला.अत्यंत दर्जेदर असे झालेल्या या गझल संमेलनात  मराठवाड्यातील अनेक नामांकित गझलकार सहभागी झाले होते . स्नेहलता झरकर -अंदुरे यांना या संमेलनात मुशायरा अध्यक्षपदाचा बहुमान…

  • भोसले हायस्कूल मध्ये पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने २७० कृत्रिम घरट्यांचे विद्यार्थ्यांना वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात नोव्हेंबर ०५ते १२नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (१२ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली (५ नोव्हेंबर) यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या वतीने पक्ष्यांसाठी २७० कृत्रिम…

  • जिल्हा बँकेला ₹ ७४ कोटींचे शासकीय अर्थसहाय्यराज्य मंत्रिमंडळाचा जिल्ह्यासाठी मोठा निर्णय

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला राज्य सरकारचे पाठबळ धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने ₹ ७४ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने…

  • राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

    नळदुर्ग / अणदूर प्रतिनिधी नळदुर्गचे सुपुत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे,ते काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. मंगळवारी (११) रोजी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते तुळजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस…

  • धाराशिव जिल्हयात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

    धाराशिव / प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता परंतु आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हयातील आठ ही नगरपरिषद निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून समजते. जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर , उमरगा, नळदुर्ग…

  • श्री स्वामी रामानंदाचार्य पादुका दर्शन सोहळा संपन्न ; गरजु महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

    कळंब / प्रतिनिधी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा रविवार दि . ९ नोहेंबर रोजी सकाळी १० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाला. जिल्ह्यातील हजारो भाविक-भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला सकाळी दहा वाजता कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य…

  • कामगार नेते हनुमंत ताटे, संदीप शिंदे यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी कुलदीप सावंत हे सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. एसटी महामंडळात कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून त्यांना शासकीय सेवेत मार्गदर्शन केले. आज त्यांच्या कार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केले. महाराष्ट्र…

  • संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

    परंडा / प्रतिनिधी संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्च पासपासून ते शिस्तबद्ध संचलनाद्वारे उत्कृष्ट संघभावना प्रदर्शित केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रा. गे. शिंदे कॉलेजचे माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे, माजी क्रीडा शिक्षक शिवाजी कदम, ऍड. संतोष सूर्यवंशी, धीरज ठाकूर, दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके,…