Live News…..Breaking News!

.

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाची जडणघडण, त्यामागील तत्त्वज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अद्वितीय योगदान आणि आधुनिक भारताच्या घडणीत संविधानाची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने प्रमुख पाहुणे…

  • संविधान दिनानिमित्त मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत डाँ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

    धाराशिव / प्रतिनिधी आज संविधान दिनाच्या निमित्ताने धाराशिव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे , मित्र चे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील,भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य,युवराज…

  • शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश पीक विम्याचे २२० कोटी मिळणार — आमदार राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी शेतकर्‍यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे प्रलंबित असलेल्या 2020 सालच्या पीक विम्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रूपये व्याजासह तातडीने शेतकर्‍यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकर्‍यांना देण्याचे…

  • शिवसेनेच्या उमेदवारांच्या धाराशिव मध्ये प्रचाराचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतील प्रभाग क्रमांक 16 येथील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज प्रभागातील नागरिकांच्या हस्ते कपालेश्वर महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ. शोभा अरुण देवकते – प्रभाग 16 अ अभय गणपतराव जाधव – प्रभाग क्र. ब यांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत कपालेश्वर महादेव…

  • दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीतील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग क्रमांक ११ अ चे उमेदवार राहुल काकडे आणि प्रभाग क्रमांक ११ ब च्या उमेदवार सौ. दिपाली धनंजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व मा.जिल्हाध्यक्ष नितीन काळे व प्रभागातील नागरिकांंच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. शहरातील…

  • तुळजापुर पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगर परिषद शाळा क्रमांक २ च्या वतीने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन नगरपालिका मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी , अंतर्गत लेखा परीक्षक अधिकारी शरद पवार, भंडार विभाग प्रमुख बापू रोचकरी, महेंद्र पाटील उपस्थित होते.यावेळी शहरातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती…

  • धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांची जाहीर सभा

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)तर्फे 26 नोव्हेंबर बुधवारी धाराशिवमध्ये भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिंदे यांचे धाराशिव शहरात आगमन सायं. 6 वाजता होणार असून, ते आझाद चौकातील जाहीर सभेला संबोधित करतील. ही सभा नगराध्यक्षपदाच्या…

  • शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडीच्या धाराशिव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री धारासूरमर्दिनी, हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांना वंदन करून, नारळ वाढवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रचार सुरु करण्यात…

  • एनव्हीपी शुगरच्या 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजनकारखान्याच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने सन 2025- 2026 च्या द्वितीय गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजन तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती आनंदीदेवी पवन राजेनिंबाळकर व कारखान्याचे मार्गदर्शक मा. आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते दि.24 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. तसेच 24 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू…

  • तेर मध्ये मराठाकालीन शस्त्रे प्रदर्शन पहाण्यासाठी गर्दी

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने आयोजित मराठाकालीन शस्त्र प्रदर्शन पहाण्यासाठी नागरीकानी गर्दी केली होती. बार्शी येथील माधवराव देशमुख यांच्या खाजगी संग्रहालयातील मराठकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मराठाकालीन शस्त्राचे प्रदर्शन पहाण्यासाठी तेर येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक यांनी गर्दी केली होती. या…