धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषद निवडणूकीत उद्या दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी धाराशिव शहरातील शिवसेनेच्या व शिवसेना पुरस्कृत सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ सायंकाळी 7-00 वाजता शहरातील जिजाऊ चौक धाराशिव येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख मा.आ.राजन साळवी सह संपर्कप्रमुख श्री देवकते…
तुळजापुर / प्रतिनिधी येथील तुळजाभवानी महाविद्यालय आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल चे 53 महाराष्ट्र बटालियन चे कॅडेट 7th महाराष्ट्र बटालियन च्या गर्ल कॅडेट तसेच तुळजाभवानी महाविद्यालयाचे सिनीयर कॉलेजचे कॅडेट यांनी मिळून एनसीसी डे साजरा केला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवनराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक रणजीत मुंडे यांंच्यासह…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीतील तुतारी चिन्हावरील 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ धाराशिव येथे बुधवारी रात्री भव्य जाहीर सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे म्हणाले की ,“महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा होती; भाजपाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट ) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय अण्णा बताले व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार( दि.२८) रोजी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रचार प्रमुख अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख यांनी दिली आहे.या सभेला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ.नवाब…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच प्रभाग क्र. ९ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. दिपाली अरुण यादगिरे आणि सुजीत दिपकराव साळुंके यांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना…
धाराशिव / प्रतिनिधी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची ‘ १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीतील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, नगरसेवक पदाचे उमेदवार नय्यर जहागिरदार यांच्यासह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रेव्दारे मतदारांशी सवांद साधला व भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवहान केले. नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. १० मध्ये भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधुन…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपतीसंभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालय व श्री साई जनविकास आय टी आय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून झालीविद्यार्थ्यांनी एकच स्वरात प्रास्ताविकेचे पठण करत लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता या संविधानिक मूल्यांबद्दल ठाम निष्ठा व्यक्त केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेयोगदान आणि भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन केले. प्रा . डॉ. मोहसीन शेख यांनी “युवकांची संविधानिक कर्तव्ये” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले इंजिनिअरिंगचे प्राचार्य यांनी संविधान देशाला सार्वभौम ,समाजवाद ,धर्मनिरपेक्ष , लोकशाही प्रजासत्ताक घोषित…
परंडा / प्रतिनिधी उद्योजक तथा परंडा तालुक्यातील भूमीपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष शिवश्री रामभाऊ पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद 2025 यांच्यावतीने राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी सहकुटुंब हा पुरस्कार स्विकारला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने सन…
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून रॅलीचे उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी भारतीय संविधान दिनानिमित्त आज सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान व मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक संविधान उद्देशिकेचे…