धाराशिव / प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी ₹ १२७८ कोटी दिवाळीपासून आजवर शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतक-यांना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि…
तुळजापुर / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तिर्थक्षेत्र तुळजापुर येथील मातंगनगर , भीमनगर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा तुळजापूर येथे संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सेवाकार्यातुन 100 विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी आसनपट्टीचे वाटप करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक किशोर साठे , संस्थेचे अध्यक्ष भाजपा नेते सागर पारडे , उपाध्यक्ष चेतन पांडागळे…
ळजापूर / प्रतिनिधी तुळजापुर नगरपालिका निवडणूकीत महिला मतदारांचा वाढलेला टक्का म्हणजे ही परिवर्तनाची नांदी आहे. धनशक्तीवर जनशक्तीचा विजय या निवडणूकीत होणार आहे असे सांगत तुळजापूर शहरातील मतदार बांधवांचे आभार महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मानले. नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.चे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.3) कारखानास्थळी विविध उपक्रमाने अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. चेअरमन पाटील यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्मचार्यांना थंडीपासून सुरक्षेसाठी ट्रायसूट, ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर, कपडा तसेच सुशोभिकरणासाठी कारखान्याच्या विविध विभागास वृक्षाच्या कुंड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य शेतकी…
धाराशिव / प्रतिनिधी श्रीक्षेत्र रुईभर येथील श्रीदत्त मंदिरात सुरू असलेल्या श्रीदत्तजयंती महोत्सव नाम सप्ताहात , थोर दत्तभक्त ,आंध्रप्रदेश चे राजकवी संगीतकार आणि संगीतकलानिधी पद्मभूषण मास्तर कृष्णराव यांचे शिष्य असलेले श्री.वसंतराव कोंडो तुळजापूरकर यांनी रचलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या श्री दत्त पदांचा गीत कस्तुरी हा कार्यक्रम, संस्कार भारतीचे जिल्हा सहसचिव श्री प्रसन्न कुमार कोंडो आणि सौ.गीता कोंडो…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करण पाटील मैदानात धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असून धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असताना प्रचाराला जोरदार उधाण आले आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) पक्षाला बळ देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचे सुपुत्र करण…
धाराशिव / प्रतिनिधी वडगाव सिद्धेश्वर येथील जिल्हा परिषद प्रशालेत अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने बालदिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस वितरण आणि मुलांना साहित्यिक मेजवानी दिली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत- कावरे, अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सुलभा देशमुख यांनी प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात “सुबह सवेरे लेकर तेरा…
शासकीय लेखा परीक्षणातून उघड – भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा आरोप धाराशिव / प्रतिनिधी मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या…
धाराशिव / प्रतिनिधी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्या प्रेरणेने तसेच रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश मनसुळे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक सहल उत्साहात आणि शिस्तबद्धतेने पार पडली. सहल नियोजन समितीतील सर्व शिक्षकवृंद यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, समुद्रकिनारे, कृषीशास्त्र, समाजसुधारणा व संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले. या सहलीत…
धाराशिव / प्रतिनिधी मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याकडुन गाळपास आलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्रती मेट्रीक टन २ हजार ७५० रुपयेप्रमाणे ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मागील वर्षीप्रमाणे कारखाना ऊस विकास योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील…