Live News…..Breaking News!

.

  • तुळजापूरच्या कृष्णा गवळी यांची ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग कोलकाता संघामध्ये निवड

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील व देशातील विविध शहरात अल्पावधीत आपला नावलौकिक केलेल्या टेनिस  क्रिकेट मधील कृष्णा कालिदास गवळी यांची भारतातील आयपीएल च्या बरोबरीने असणारी ISPL (इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग) या भारतातील सर्वात नामांकित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोलकत्ता संघाकडून 8 लाख पन्नास हजार या रकमेवरती लिलाव बोलून घेण्यात आले. ही स्पर्धा पूर्णपणे IPL (आयपीएल) स्पर्धेसारखी…

  • तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संघरत्न नगदेच्या प्रयोगास द्वितीय क्रमांक

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने आयेाजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या संघरत्न सुभाष नगदे याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल संघरत्न नगदे या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. धाराशिव शहरातील यशवंतराव चव्हाण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सोमवार, 8 डिसेंबर…

  • व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , पर्यावरण या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा व्यंकटेश महाजन महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आली. या कार्यशाळेत पर्यावरण या विषयावर पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ.रवींद्र जयभये व प्रा.…

  • तुळजापुर नगरपालिका शाळेत पिंक पथकाचे मार्गदर्शन

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत पिंक पथकाने सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महिला पोलीस सोनाली जाधव व उज्वला भोजगुडे यांनी विद्यार्थ्यांना गुड व बॅड टच याविषयी मार्गदर्शन करून आपल्या परिसरात काही अनुसूचित घटना घडल्यास आपण तात्काळ पोलिसाची ११२…

  • उज्जैनच्या महामंडलेश्वरांकडून श्री तुळजाभवानी मातेची ओटीभरण पूजा

    तुळजापूर / प्रतिनिधी मध्य प्रदेशातील उज्जैन नगरीत असलेल्या श्री मौनतीर्थ पिठाधीश्वर अनंतश्री विभूषित ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ. सुमनानंद गिरिजी महाराज यांनी आज, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेची ओटीभरण पूजा करून मनोभावे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.महामंडलेश्वर स्वामी डॉ. सुमनानंद गिरिजी महाराज यांच्या…

  • तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीस महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी सोलापूर -तुळजापूर- धाराशिव या रेल्वे मार्गासाठी विविध माध्यमातून सन 2006 ते 2025 पर्यंत केलेल्या आंदोलनाबद्दल तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती ला आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन चा ” महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025″ जाहीर झाला आहे. सदर संस्था विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीचा हा पुरस्कार देऊन गौरव करते . श्री तुळजाभवानी मातेचे…

  • तेर येथे सौर ऊर्जेवरील कृषी उत्पादनाचे प्रात्यक्षिक पहायला गर्दी

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे सौर ऊर्जेवरील कृषी उत्पादनाचे प्रात्यक्षिक पहायला गर्दी होऊ लागली आहे. सखी युनिक रिसोर्स एंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील एकमेव केंद्र तेर येथे करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये प्रमुख साधने व प्रात्यक्षिके सौर ऊर्जेवरील चालणारे यंत्र(पिकावर औषध फवारणीसाठी ऊर्जा बचतीचे यंत्र), सौर ड्रायर (अन्न प्रक्रिया…

  • माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या स्वनिधीतून उंडेगाव ते कडवकर वस्ती कामाचा शुभारंभ .

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्याचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातुन तालुक्यात स्वखर्चातून रस्ते करून देण्याचा सपाटा सुरूच असुन युवा सेना तालुकाप्रमुख तथा परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल डोके यांच्या पुढाकारातुन उंडेगाव ते कडवकर वस्ती या रस्ता कामास सुरुवात करण्यात आली. परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर…

  • वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

    धाराशिव / प्रतिनिधी महायुतीचे सरकार येऊन वर्ष झाले पण भाजपच्या नेत्यांनी प्रगती पेक्षा स्थगितीसाठी शक्ती पणाला लावल्याने जिल्ह्यात स्थगिती दिसली पण प्रगती काय दिसेना असा थेट पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे. याबाबत जाधवर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दरवर्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता पूर्ण असं…

  • भैरवनाथ शुगर सोनारी कारखाना चालू हंगामासाठी शेतक-यांना पहिली उचल 2800/- रुपये प्रमाणे देणार

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचे चालू गाळप हंगाम 2025-26 मधील गाळप आज अखेर 151445 मे.टन झाले आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही असे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचा विचार करुन कारखान्याचे संस्थापक तथा परंडा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर…