Live News…..Breaking News!

.

  • सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरचे आणखी एक पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी तब्बल दोन हजार वर्षांपेक्षा अधिक पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या प्राचीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी एक कोटी ६४ लाख रुपये उपलब्ध झालेले आहेत. एकूण पाच कोटी ११ लाख रुपयांच्या माध्यमातून इ.स. पहिल्या शतकातील घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या प्राचीन तीर्थकुंडाला आता नवी…

  • कृषी  महाविद्यालयात  जागतिक  मृदा  दिन  उत्साहात  साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी  व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास कृषि महाविद्यालयमध्ये  डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.    सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मृदा पूजन करून करण्यात आली. “मृदा संवर्धन ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी सुपीक जमिनीचे रक्षण अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या  सीमा सय्यद यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.तसेच त्यांनी आपल्या प्रेमा गोपालन  शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती दिली. सुवर्णा घाडगे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले. कृषि सहाय्यक  सुषमा काळे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनाची माहिती दिली. मृदा शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पल्लवी घोडके यांनी माती पाणी  परीक्षणाचे महत्व व खत व्यवस्थापन या विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . डॉ. अमित गांधले यांनी  मृदा आरोग्य संवर्धन, सेंद्रिय शेती, खत व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी “मृदा आरोग्य कार्ड” उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत शाश्वत कृषी पद्धती अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.या कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा हरी घाडगे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिल भालेकर यांनी केले तर आभार डॉ. सागर बुरगुटे यांनी मानले.

  • दत्ताभाऊ कुलकर्णी यांना आदर्श लोमटे कडून पेन्सिल स्केच चित्र भेट

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तुगांव येथील इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी कु.आदर्श सचिन लोमटे याने दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे हुबेहूब पेन्सिल स्केच पेंटीग चित्र भेट दिले. यावेळी दत्ताभाऊ यांनी चित्र पाहताच खूप छान म्हणत कौतुकाची थाप टाकत आदर्श तुझी कला अप्रतिम आहे असं म्हणून…

  • धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावरील लुटमारींच्या घटनांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे — ॲड. व्यंकटराव गुंड

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव–बीड (सोलापूर–धुळे) राष्ट्रीय महामार्गावर अलीकडील काळात लुटमारी, चोरी, जबरी मारहाण, चेन स्नॅचिंग आणि वाहनचालकांना अडवून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड. व्यंकटराव गुंड (संस्थापक – रुपामाता उद्योग समूह व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. येरमाळा ते वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ब्लॅकस्पॉटवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत…

  • ” हिवाळ्याची अशी घ्यावी आरोग्याची काळजी

    डाँ अस्मिता अजित बुरगुटे सध्या सर्वत्र हिवाळा जाणवु लागलाय आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू आदर्श मानला जातो ऑक्टोंबर हिट नंतर लगेचच गार वाऱ्याची झुळूक सुखावत असताना या हिवाळ्या साठी आपण अंतर्गत आणि बाह्य अंगान तयार झालोय का? दिवाळीचे सेलिब्रेशन ऐन रंगात आलेलं असताना हिवाळ्याचीही चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.लवकर पडणारा अंधार आणि सकाळ संध्याकाळ वाहणारे गार…

  • विकसित धाराशिव @2047 आरोग्य विषयक कार्यशाळा दिशा दर्शक – डॉ. सतिश हरिदास

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि भविष्यकालीन विकासाचा मार्ग आखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित धाराशिव @2047’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि भावी नियोजनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर येथे एकदिवसीय अभ्यासपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि टीस् TISS तुळजापूरचे कॅम्पस…

  • संत मीरा पब्लिक स्कूलचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांकयशस्वी विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार

    परंडा / प्रतिनिधी खंडेश्वर इंग्लिश मेडीयम स्कूल, परंडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव व तालुका गटशिक्षण विभाग यांनी केले होते. यामध्ये संत मीरा पब्लिक स्कूलच्या कु. दिव्या संतोष वाडकर व भक्ती भुजंग भांडवलकर (इ. 9 वी) यांनी मानवनिर्मित आपत्ती (विमान दुर्घटना व प्रभावी उपयोजना ) या विषयावर मार्मिक पद्धतीने प्रयोग…

  • राष्ट्रवादी  काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद  पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त  वृक्षारोपन -डाँ प्रतापसिंह पाटील  

    धाराशिव  / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते . शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाँ प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून तब्बल एक हजार वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती डाँ पाटील यांनी दिली. जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये खा.पवार यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनातील योगदानाची आठवण करून देऊन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे हीच खरी वाढदिवसाची भेट असेल वडाचे झाड ‘आयुष्याचे प्रतीक’ मानले जाते. दीर्घायुष्य, सावली आणि ऑक्सिजन भरपूर देते यामुळे वडाची लागवड विशेष महत्त्वाची ठरते.अनेकांना या रोपांची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे .“वडाला जगवलं तर पिढ्या जगतात,” या भावनेने वृक्षारोपण या उपक्रमामुळे जिल्ह्यात हरित वातावरण निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • जूनियर वकिलांना स्टायपेंड  द्या , खाजगी विधेयक लोकसभेत मांडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    धाराशिव / प्रतिनिधी  देशाच्या न्यायव्यवस्थेची ताकद म्हणजे न्यायासाठी लढणारी तरुण वकिलांची पिढी. पण सत्य हे आहे की न्यायालयात सुरुवात करणाऱ्या अनेक ज्युनियर वकील बांधव-भगिनींना पहिली काही वर्षे कोणताही आर्थिक आधार नसतो. त्यामुळे अनेकजण आर्थिक अडचणींमुळे हा व्यवसाय सोडतात आणि सक्षम न्यायव्यवस्थेचे स्वप्न अधुरं राहतं. अधिवक्ता अधिनियम 1961 या बिलावर दुरुस्तीसाठी खाजगी विधेयक मांडले अशी माहिती…

  • मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची हॉटेल रोमा येथे दि.१० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि जनसहभागातून साजरा होईल असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गेली ३६ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात ठसा उमटवणारा…