धाराशिव / प्रतिनिधी श्री सिद्धीविनायक परिवार धाराशिव यांच्यावतीने कळंब तालुक्यातील नागझरवाडीत येथे माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. खामसवाडी येथे सुरू असलेल्या माती व पाणी परीक्षण संकलन केंद्राच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेण्यात आली. श्रीसिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. अल्प दरात…
परंडा / प्रतिनिधी तालुक्यातील करंजा येथील रहिवासी उद्योजक असलेले रामभाऊ पवार कुटुंबियांच्या वतीने एक एकरामध्ये भव्य विहिरीचा शुभारंभ व स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन दि १० डिसेंबर रोजी करण्यात आले होते . या कार्यक्रमाला परिसरातील हजारो शेतकरी , पवार ग्रुप उद्योग समूहातील कार्यकर्ते पदाधिकारी व रामभाऊ पवार यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या…
धाराशिव / प्रतिनिधी विशाखापट्टनम येथे चालू असलेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत रोलर हॉकी प्रकारातून धाराशिवच्या श्रीलेश शिंदे याने कास्य पदक पटकावले असून तो कॅडेट वयोगटातून महाराष्ट्र संघातून खेळत होता. भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश राज्य रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 30 वर्षानंतर प्रथमच मुलांच्या महाराष्ट्राच्या संघाने कास्य पदक पटकावले आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पाच टक्के नजराणा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या भोगवटदार वर्ग-२ मालमत्ता वर्ग-१ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुधारणेमुळे रहिवाशी क्षेत्रातील तब्बल ७० हजार प्लॉट अथवा घरे निःशुल्क वर्ग-१ होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील दोन…
परंडा / प्रतिनिधी भारत देशाचे माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराजजी पाटील-चाकुरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले यावेळी त्यांना २ मी. स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संघर्ष योध्दा, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखा मागील १४ वर्षांपासून जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत असून नाट्य चळवळीला बळकटी देण्याचे काम सातत्याने करत आहे. जिल्ह्यात नाट्य चळवळ व्यापक प्रमाणात वाढली असून सर्व नागरिक व कलावंतांनी नाट्य परिषदेचे सभासद व्हावे,असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य तथा धाराशिव नाट्य परिषदेचे अध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा ही जवळपास दोन वर्षे रेंगाळलेल्या निविदा प्रक्रियेमुळे झाली असून त्याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत केली आहे. नागपूर मुक्कामी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही मागणी केली आहे. शहरातील आठवडी बाजार, सार्वजनिक उद्याने,…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याचा तिसरा गाळप हंगाम सन 2025 -26 यशस्वीपणे चालू आहे. कारखान्याने दिनांक 10 डिसेंबर अखेर 1,58, 670 मेट्रीक टन गाळप केले आहे. भारतातील साखर उद्योग हा प्रामुख्याने यापूर्वी साखर निर्मितीच्या दिशेने चालत होता परंतु…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव परिसरातील आंबेडकर साखर कारखान्याने 2025–26 गाळप हंगामात आजअखेर 1 लाख 35 हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. गळीतास आलेल्या उसासाठी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या उसाचा प्रथम हप्ता प्रतिटन 2,750 रुपये इतकी रक्कम आज, 10 डिसेंबर 2025 रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली.या सोबतच कारखान्यात नोंद झालेल्या सर्व उसाचे…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था, तुळजापूर यांच्या वतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव २०२६ निमित्त शनिवार, दिनांक : १० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १० : ०० ते सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीपर्यंत एकूण तीन गटात राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभवानीची. . . वक्ता महाराष्ट्राचा…