Live News…..Breaking News!

.

  • जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कडक कारवाई होणार – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बोगस डॉक्टरांनी अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू केला असून,अशा बोगस डॉक्टरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.तसेच भविष्यात कोणीही अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचे धाडस करणार नाही,असा कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत,असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी तथा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) शोधन जिल्हास्तरीय…

  • नवनियुक्त भाजपा पदाधिका-यांचा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    परंडा / प्रतिनिधी भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी, परंडा च्या मोर्चा व आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या निवडी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे यांनी जाहीर केल्या असून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत…

  • कल्याणसागर विद्यालयातील बाजार डे चा मा.आ. ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

    परंडा / प्रतिनिधी परंडा येथील कल्याणसागर समुहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने आयोजित बाजार डे (Bazar Day) चे फीत कापून उद्घाटन भाजपाचे नेते मा.आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध स्टॅालना भेटी देऊन खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला तर काही…

  • तेरणा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने हायर एज्युकेशन लीडर ऑफ द इयर -२०२५  पुरस्स्कारने सन्मानित

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना  १२ डिसेंबर २०२५ रोजी फेअरफील्ड बाय मॅरियट, पुणे येथे झालेल्या सिम्पलीलर्न युनिव्हर्सिटी लीडर्स फोरममध्ये उच्च शिक्षण नेते – २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि पुनर्कौशल्य यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात…

  • माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्यास प्रारंभ

    शेतकरी नेते आणि जगताप यांची माहिती. धाराशिव / प्रतिनिधी देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी “सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे”आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात भातागळी तालुका लोहारा येथून शरद पवार साहेबांवर अजन्म प्रेम करणाऱ्या पाच शेतकरी बांधवांच्या हस्ते करून एक वेगळी प्रथा आणि परंपरा जोपासली असल्याचे माहिती…

  • तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ. कैलास पाटलांचा विधान भवनात प्रहार!​’अग्रवाल’ या मुख्य आरोपीला अटक का नाही?; कैलास पाटलांचा सरकाला सवाल

    धाराशिव / प्रतिनिधी स्थानिक ​बातमीदारांवर दबाव आणि ड्रग्ज माफिया मोकाट अशी स्थिती तुळजापूरात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ड्रग्ज प्रकरण इतकं हलक्यात घेत आहेत असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की “तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.”​”तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ‘अग्रवाल’…

  • स्वातंत्र सेनानी कै भानुदासराव धुरगुडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य विभागीय स्पर्धांचे आयोजन

    तुळजापूर / प्रतिनिधी स्वातंत्र्य संग्राम सेनानी कै.भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त मराठवाडा  समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने मराठवाडा विभागीय वकृत्व, सामान्य ज्ञान व    भव्य मॅरेथॉन आणि शालेय स्पर्धेचे आयोजन दि. ३१  डिसेबर  २०२५ व दि.१ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केल्या आहेत. यंदाचे हे स्पर्धेचे २७ वे वर्ष आहे अशी माहिती    अध्यक्ष स्वा.…

  • तुळजापुरातील पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी हुर्डा पार्टी सहल

    तुळजापूर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापुर शहरातील पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने रविवारी महिलांसाठी विशेष हुर्डा पार्टी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल सोलापूर येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडली. या उपक्रमात सुमारे ४० महिलांसह मुलांनी सहभाग घेतला असून निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी मनसोक्त आनंद आणि धमाल अनुभवली. सहलीदरम्यान पारंपरिक हुर्डा पार्टी, संगीतमय कार्यक्रम, गाणी,…

  • तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचणारे पोलिसांच्या रडारवरगृहराज्यमंत्र्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर

    धाराशिव / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्क बदनामी करणारे सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या महंतांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचणारांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच त्या सर्वांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा शब्दात…

  • प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन!

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ठाम आवाज उठवत मोठे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग नागरीक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी विविध मागण्या केल्या आहेत त्यामध्ये दिव्यांगांसाठी मंजूर असलेला 30 लाखांचा आमदार निधी तात्काळ खर्च करावा , निराधार/दिव्यांग योजनेतील २५ वर्षांची अट रद्द…