Live News…..Breaking News!

.

  • अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात!धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी !पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला शेतक-यांना आधार

    धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश झळकला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती, उभी पिके आणि गोठ्यातील पशुधन अक्षरशः वाहून नेले. कष्टाच्या जीवावर उभे असलेले संसार एका क्षणात उध्वस्त झाले. अशा वेळी केवळ मदतीचा शब्द नाही, तर कृतीतून आधार देणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र राज्य…

  • राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत धाराशिव च्या संघास उपविजेतेपद

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ठाणे येथे दि. ९ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत धाराशिव विभागाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. तब्बल चाळीस वर्षांनंतर धाराशिव विभागास हा मान मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज, धाराशिव…

  • एनव्हीपी शुगरच्यावतीने चौथ्या पंधरवाड्यात गाळपास आलेल्या ऊसाचे बिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

    चेअरमन नानासाहेब पाटील यांनी द्वितीय हंगामातही ऊसबिल देण्याचा शब्द पाळला धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने सन 2025- 2026 च्या द्वितीय गळीत हंगामात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल (दि.16) संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील…

  • तेरणा स्पर्धां परिक्षा मार्गदर्शन केंद्रात स्व. डाँ सौ चंद्रकलादेवी पाटील यांना अभिवादन

    धाराशिव / प्रतिनिधी येथील स्व.डॉ.सौ.चंद्रकला देवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा केंद्र धाराशिव येथे स्व.डॉ.सौ चंद्रकलादेवी पदमसिह पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. संवेदनशील ,कर्तुत्वान , स्वभावाने प्रेमळ असणाऱ्या स्व.डॉ.सौ. चंद्रकलादेवी पाटील यांचे स्मरण नेहमी आम्हास ऊर्जा देते त्यांच्या आदर्श व प्रेरणेतून आणि माजीमंत्री डॉ पदमसिह पाटील यांच्या आशिर्वादाने आ राणाजगजितसिह पाटील…

  • वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाजवळ बस थांबा द्या — माजी मंत्री मधुकरराव चव्हाण 

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीजवळ सर्व बसेसना थांबा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी धाराशिवचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांना दिनांक १६/१२/२०२५ रोजी सविस्तर पत्र पाठवले आहे.पत्रानुसार, नळदुर्ग रोडवर शहरापासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर असलेल्या नवीन न्यायालय इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या प्रवाशांना रिक्षाभाडे…

  • शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा – खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी

    महाराष्ट्र –देशातील शेतकरी आज गंभीर आर्थिक संकटात सापडलेला असताना, त्यांच्या हक्कांसाठी निर्णायक पावले उचलण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज लोकसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ आणि संपूर्णपणे अंमलात आणण्याची ठाम मागणी केली. खासदार निंबाळकर म्हणाले की, उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा देणारी हमीभाव (MSP) व्यवस्था शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरेल. वाढती महागाई, खत-बियाण्यांचे दर, मजुरी खर्च…

  • सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर शेळके यांची निवड

    तुळजापूर / प्रतिनिधी भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ- सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी तुळजापूर येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक व समाज सेवक मधुकर बबनराव शेळके यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बु-हाडे यांच्या मार्गदर्शनात , समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बु-हाडे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष सुजित सेठ…

  • बिलाल मुल्ला यांचे बीफार्मसी परिक्षेत सुयश

    लोहारा / प्रतिनिधी भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्लायांचा मुलगा बिलाल मुल्ला या विद्यार्थ्यांने कर्नाटक राज्यात लहानपणापासून सीबीएससीचे शिक्षण घेऊन बी फार्मसी पदवी (डीग्री) परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या विद्यार्थ्याने राजीव मेमोरियल एज्युकेशन सोसायटी ऑफ फार्मसी गुलबर्गा, कलबुर्गी या कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन…

  • कृषी महाविद्यालयात ‘महाविस्तार’ ॲपवर मार्गदर्शनपर व्याख्यान –

    धाराशिव / प्रतिनिधी व्ही.पी. शैक्षणिक संकुलातील श्री साई जनविकास कृषी महाविद्यालय आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविस्तार या नव्या एआय-आधारित ॲप संदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी महेश देवकते हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार…

  • जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना लाभणार जगविख्यात नागपूर ‘आयआयएम’ चे  मार्गदर्शन

    मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती  धाराशिव / प्रतिनिधी महायुती सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना बळ मिळत आहे. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे  हे प्रकल्प जागतिक दर्ज्याचे व्हावे व त्यांना अधिक गती मिळावी यासाठी आपल्याला व्यवस्थापन क्षेत्रात जगविख्यात असलेल्या नागपूर ‘आयआयएम’चे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तारा व…