Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव जिल्हयात आठ नगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा भारतीय जनता पार्टीला चार शिंदे सेनेला चार नगराध्यक्षपद

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव , तुळजापुर , नळदुर्ग , मुरुम , उमरगा, भूम , परंडा आणि कळंब या आठ नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज रविवारी जाहीर झाले असून आठपैकी चार नगरपालिकावर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर उर्वरित चार नगरपालिकांवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणूकीत…

  • नळदुर्ग नगरपालिकेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्षपदी भाजपाचे बसवराज अप्पा धरणे विजयी

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराजअप्पा विजयकुमार धरणे यांनी ४२० मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करीत निवडणूकीत घवघवीत यश मिळविले आहे, त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक जगदाळे व एमआयएमचे उमेदवार शहबाज काझी यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज अप्पा धरणे यांना ४३३१ मते मिळाली धरणे हे ४२०…

  • कळंब मध्ये महायुतीच्या सौ.सुनंदा ताई कापसे नगराध्यक्षपदी विजयी तरराष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या हातात भोपळा?

    कळंब / प्रतिनिधी कळंब नगरपरिषदेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर महायुतीचे उमेदवार सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी उबाठा गटाच्या शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या रश्मी संजय मुंदडा यांच्यावर २२५४ मताने आघाडी घेत शिवसेनेच्या सौ.कापसे विजयी झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रा.मीनाक्षी भवर यांना तीन क्रमांकांची मते मिळाली आहेत यामध्ये कापसे यांना ७६८९ तर सौ. रश्मी…

  • उमरगा नगरपरिषदेवर भगवा फडकला;शिवसेना-काँग्रेस आघाडीचे किरण गायकवाड यांचा दणदणीत विजय

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. आघाडीचे उमेदवार किरण गायकवाड यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल ६ हजार २४२ मतांच्या फरकाने पराभव करत नगराध्यक्षपदावर आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे.या निवडणुकीत राजकीय समीकरणे ऐनवेळी बदलली होती. शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत आघाडी केली होती, तर दुसरीकडे भाजप आणि…

  • जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

    धाराशिव / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने सन २०२६ च्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी, तसेच मंदिर संस्थानचे नागेश शितोळे, अभय रावळे, रमेश कवडे आदी उपस्थित…

  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    धाराशिव / प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग, उमरगा,मुरुम,कळंब,भूम व परंडा या नगरपरिषदांचा समावेश आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी,या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील खाली नमूद नगरपरिषद हद्दीतील २१ डिसेंबर २०२५ रोजी भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवणे अथवा पुढे ढकलणे आवश्यक असल्याने,द मार्केट…

  • हासेगाव येथे आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

    कळंब / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील हसेगाव के. येथील पर्याय सामाजिक संस्था कॅम्पस मध्ये दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महिला बचत गट सदस्य आणि फायनान्स कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी साधन संस्थेकडून मेहताब आलम तसेच अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस चे व्यवस्थापकीय संचालक विश्वनाथ तोडकर, मुख्यालयाचे यशवंत आहेर,तेजश्रीताई तोडकर,अनिक धाराशिव जिल्हा ऑपरेशन हेड विलास…

  • लोकसभेत खासदार ओमराजे निंबाळकरांचा दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी ठोस पुढाकार

    धाराशिव / प्रतिनिधी लोकसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहात मांडला. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याच्या नदीजोड प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची ठाम मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. वैतरणा, उल्हास, नारपार, औरंगा, दमणगंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नद्यांचे सुमारे ५५ टीएमसी पाणी…

  • युवा कार्यप्रशिक्षण योजना मतदान घेण्यासाठी राबविली – आमदार प्रवीण स्वामीनागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या विविध प्रश्नांची दिली माहिती

    उमरगा / प्रतिनिधी युवा कार्यप्रशिक्षण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान घेण्यासाठी ही योजना राबवली आहे. पण आता त्या लोकांना त्यांनी वा-यावर सोडले असून, त्या लोकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप उबाठा शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध महत्त्वाचे प्रश्न मांडल्याची माहिती देताना उमरगा…

  • बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची परंडा किल्ल्यात स्वच्छता मोहीम

    परंडा / प्रतिनिधी परंडा बावची येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली. यामुळे…