धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील शासकीय दुध डेअरी समोरील जागा हस्तातरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटना संघर्ष करीत होत्या.याबाबत समाज बांधव यांना सोबत घेऊन सर्व पातळीवर पाठपुरावा केला. समाज बांधवांच्या लढ्याला यश मिळाले आहे. शासनाला उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. याबाबत आमदार .पाटील म्हणाले की ,शासकीय दुध…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव २०२५ हा २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला होता. या महोत्सवाच्या दरम्यान २९ सप्टेंबर रोजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या काळात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा ड्रोन शो स्थगित करण्यात आला होता.…
धाराशिव / प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून धाराशिव शहरातील प्रलंबित असलेले रस्ते कामाचा शुभारंभ मंगळवारी भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील व नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी , मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला. नगरोत्थान योजनेतून मंजूर असलेल्या धाराशिव शहरातील रस्ते कामांना देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती रद्द झाल्याने…
परंडा / प्रतिनिधी तांदुळवाडी ता.परांडा येथे अखंड 52 वर्ष हरीनाम सप्ताह संपन्न होत असताना आज गुरुवर्य डॉ. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार मा. श्री. डॉ.जयवंतजी बोधले महाराज यांचे कीर्तन स्वरूपी सेवा तांदूळवाडी नगरी येथे संपन्न झाली नुकताच डॉ.जयवंत बोधले महाराज यांना महाराष्ट्र शासनामार्फत उत्कृष्ट युवा कीर्तनकार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत मानचिन्ह देऊन सन्मानित केले त्याबद्दल मा.…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीचे नूतन नगराध्यक्ष विनोद (पिटुभैय्या) गंगणे आणि नवनिर्वाचित भोपे पुजारी समाजाची बिनविरोध निवडून आलेली नगरसेविका डाॅ.अनुजा अजित कदम परमेश्वर हिचा श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाच्या वतीने आज दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी जंगी सत्कार करण्यात आला. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी सेवा करणाऱ्या भोपे पुजारी बांधवांनी या नुतन लोकप्रतिनिधींचे स्वागत करून त्यांना…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दळणवळणाच्या मूलभूत सुविधांचा दर्जेदार लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेत आणि पाणंद रस्ते मिशन मोडवर पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या जानेवारी महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू होणार असून, यासाठी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात मिशन मोडवर हाती घेण्यात आलेल्या या…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे मुरुम चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव पाटील यांची भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते मल्हार पाटील, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते शरण पाटील,…
तुळजापूर / प्रतिनिधी हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार २०२६’ साठी तुळजापूर येथील दैनिक तरुण भारत सोलापुर चे तालुका प्रतिनिधी तथा तुळजापूर तालुका पत्रकार संघ तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अंबादासराव पोपळे यांची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीला या पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनानिमित्त मराठा मंगल कार्यालय, मलकापूर येथे होणाऱ्या समारंभात पोफळे…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव तसेच नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी दर्शन व्यवस्थेत विशेष बदल जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे पहाटे १ वाजता चरणतीर्थ, त्यानंतर दर्शन मंदिर संस्थानच्या निर्णयानुसार बुधवार दि. २ ४ डिसेंबर २०२५ ते शनिवार दि. ४…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी शैक्षणिक संकुलातील श्री साई जनविकास कृषी महाविद्यालयात नामांकित इमार्टिकस कंपनीकडून कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले. या प्लेसमेंट प्रक्रियेत महाविद्यालयातील भक्ती सुरेश चौधरी, वैष्णवी रमेश वाघ, राजेश्वरी प्रभू जाधवर, राजश्री लक्ष्मीकांत पाठक, सौरभ हनुमंत मदने, प्रीती प्रवीण पाटील, शिवानी सुधीर गव्हाणे, आश्लेषा सुरेश गोरे या आठ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली.या…