धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या ५०० खाटांच्या अत्याधुनिक नवीन जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीस गती मिळाली आहे.आरोग्य सेवा संचालक, मुंबई डॉ.नितीन अंबाडेकर यांनी आज जिल्ह्याला भेट देऊन नवीन रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची सविस्तर पाहणी केली.या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रस्तावित इमारतीचा नकाशा,विविध विभागांची रचना तसेच वॉर्डनिहाय नियोजनाचा सखोल आढावा घेतला. भविष्यातील…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून,प्रभाग क्रमांक ७ मधून जुलेखा इनामदार यांनी महिला नगरसेविका मधून सर्वाधिक तब्बल २५५ मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी शाहना बेगम खतीब यांचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक ठरलेल्या नगरपरिषदेच्या प्रभाग क्र ७ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून,काँग्रेस तर्फे नगरसेवक पदाच्या उमेदवार जुलेखा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या स्पष्ट बहुमतानंतर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. रविवारी भाजपच्या नेहा काकडे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आणि भाजपने ४१ पैकी २२ जागा जिंकत पालिकेवर वर्चस्व सिद्ध केले. या विजयानंतर लगेचच गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शहरातील रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी नगरोत्थान योजनेतून मंजूर धाराशिव शहरातील रस्ते व नालीच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे ५९ रस्त्यांची आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या…
परंडा / प्रतिनिधी जनशक्ती नगरविकास आघाडी, परंडाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शासकीय विश्रामगृह, परंडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपा नेते मा. आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित (दादा) पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह (काका) सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष मुकुलमालक देशमुख तसेच जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत कसोटीच्या काळात पक्षाचे पुरेसे बहुमत नसताना देखील परंडा नगरीचे नगराध्यक्ष पद भाजपाचे नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी भूषविले होते त्यांच्यानंतर त्यांचे बंधू सुबोधसिंह ठाकूर यांनी उपनगराध्यक्ष व गटनेतेपद परंडा पालिकेचे भूषविले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आता ठाकूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीने नगरपालिकेच्या राजकारणामध्ये प्रवेश मिळविला असून…
यापुढे महायुती एकत्र मिळून काम करणार धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयातील जनतेने आज जाहीर झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे) पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन महायुतीच्या विकासाच्या सकारात्मक राजकारणावर विश्वास दाखविला आहे. आता आमची जबाबदारी वाढली असून विकास कामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस विकास कार्यक्रमाप्रमाणेच नगर परिषदेत १०० दिवसांचा विकास…
परंडा / प्रतिनिधी परंडा नगरपरिषदेच्या आज रविवारी झालेल्या निवडणूक मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर अतितटीच्या लढतीत 389 मतांनी विजयी झाले आहेत त्यांना या निवडणुकीत 6795 मते तर सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांना 6606 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला नगरसेवकपदाच्या आठ जागा तर जनशक्ती…
जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दमदार कामगिरी करत एकूण आठ नगरसेवक विजयी केले आहेत. या निकालामुळे धाराशिव शहरातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर आपला ठाम विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पक्षाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
तुळजापूर / प्रतिनिधी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. भाजपचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांनी १६८६ मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला आहे.या निवडणुकीत भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले असून काही प्रभागांमध्ये काँग्रेसलाही यश मिळाले आहे. मात्र एकूण निकाल…