Live News…..Breaking News!

.

  • माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

    परंडा / प्रतिनिधी भारतीय राजकारणातील शिखर पुरुष, लोकनायक, विलक्षण नेतृत्व, दूरदर्शी, अमोघ वक्ते, अजातशत्रू, माजी पंतप्रधान, प्रेरणास्त्रोत, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांना जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेवक युवा नेते समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष…

  • धाराशिव शहरातील पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक डीपी रोडचा शुभारंभ           

    धाराशिव / प्रतिनिधी  धाराशिव येथील प्रभाग चार मध्ये आनंदनगर पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक हा तेथील जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा व सोयीस्कर असलेल्या रोडच्या कामाचा शुभारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्षपदी विराजमान होताच तातडीने कामाला लागलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.नगररत्थोनच्या 147 कोटी रुपयांच्या अंतर्गत असलेल्या निधीतून…

  • जिल्हास्तरीय सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन – आकाश कोकाटे

    मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा उपक्रम धाराशिव / प्रतिनिधी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6.25 वाजता हा सोहळा होणार असून इच्छुक वधु-वराच्या पालकांनी 15 जानेवारी…

  • पालकमंत्री सरनाईक यांची मल्हार पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ८ पैकी ८ नगरपालिकांवर भाजपा–शिवसेना महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि महायुतीच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा ठोस कौल आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांनी घेतली व नगरपालिका निवडणूकीतील महायुतीच्या दैदिप्यमान…

  • केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    तुळजापुर / प्रतिनिधी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान…

  • “लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक! – पालकमंत्री प्रताप सरनाईक

    धाराशिव / प्रतिनिधी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी,या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक ४२६ येथील आवश्यक १ एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास कॅबिनेटची…

  • लोकशाही बळकटीसाठी एसआयआर (SIR) विधेयक व निवडणूक सुधारणांवर सविस्तर बैठक संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी लोकशाही अधिक मजबूत व पारदर्शक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून नवीन एसआयआर SIR (Special Intensive Revision) विधेयक व निवडणूक सुधारणा (Election Reforms) यासंदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत मतदारयादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट करणे, मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे वगळणे तसेच घुसखोर/अपात्र नागरिकांचे मतदान…

  • रुपामाता उद्योग समूहाच्या २०२६ दिनदर्शिकेचे अँड गुंड यांच्या हस्ते प्रकाशनऔद्योगिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीचा निर्धार

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता उद्योग समूह, धाराशिव यांच्या नूतन वर्ष २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समूहाचे संस्थापक तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी औद्योगिक विकासासोबतच महिला सक्षमीकरण, कृषी व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा समूहाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. रुपामाता…

  • धाराशिवमध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक! विनामूल्य जागा मिळणार, पाठपुराव्याला यश — आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार आहेत. आता लवकरच धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे…

  • गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    तुळजापुर / प्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन मंत्री पंकज भोयर यांचा सहकुटुंब यथोचित सन्मान केला. तत्पूर्वी विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी गृहराज्यमंत्री डॉ.…