Live News…..Breaking News!

.

  • जि प निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  कुंभारी येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

    तुळजापूर / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तुळजापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथे आज, २६ डिसेंबर २०२५ रोजी शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम आणि जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगरूळ जिल्हा परिषद गट तसेच मंगरूळ व आरळी पंचायत समिती गणातील तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला.…

  • प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच एमएसआरडीसी च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा — आमदार राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी लातूर–कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. कळंब आणि परिसराच्या भौगोलिक आणि अभियांत्रिकी दृष्टीने सखोल विचार करता हा मार्ग अधिक व्यवहार्य, किफायतशीर ठरणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मदत होणार…

  • धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहाताई काकडे व नगरसेवकांचा मा.आ. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    परंडा / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. नेहाताई राहुल काकडे या विक्रमी मताधिक्याने आणि त्यांचे पती व निर्वाचित नगरसेवक भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसह परंडा येथे भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते…

  • रूपामाता परिवाराचा दिल्लीत वंदे मातृशक्ती माता पूजन दिन कार्यक्रम होणारसर्व मातांचे पूजन होणार, वंदे मातृशक्ती पुस्तकाचे प्रकाशन व भजनसंध्या, भरगच्च कार्यक्रम

    अँड व्यंकटराव गुंड धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी आपल्या आईच्या नावाने रुपामाता उद्योग समूह सुरू केला आणि त्यातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आईच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी रुपामाता परिवार दिल्लीत ‘वंदे मातृशक्ति माता पूजन दिवस 2025’ साजरा करत आहे. हा देशातील मातृभूमी प्रेम, मातृसंस्कार आणि मातृत्वाच्या…

  • तुळजापुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे  कांदा उत्पादनात ४० टक्के घटशेतकऱ्यांची अनुदानाची मागणी

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील  खालच्या पट्ट्यात विशेषतः  मंगरूळ ,कात्री अपसिंगा ,कामठा, नांदुरी परिसरात खरीप हंगामातील कांदा काढणीला वेग आला असून, सतत झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा कांदा उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाली असून, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.तुळजापूर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र वर्षानुवर्षे वाढत असून, यंदा…

  • श्री खंडोबा यात्रे निमीत्त मैलारपूर येथे कुस्ती आखाड्याचे नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते पुजन

    नळदुर्ग / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील प्राचीन श्री खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे कुस्ती आखाडा समितीच्या वतीने राज्य पातळीवरील भव्य अश्या ‘कुस्ती स्पर्धा’ घेण्यात येणार आहेत. यासाठी बनवलेल्या आखाड्याचे पुजन नूतन नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष विनायक (बंडू )…

  • जिल्हयाच्या पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी आ. राणादादांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

    तेर ( म.नेता ) ” मित्र ” चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने ‘मित्र’ कार्यालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली . या बैठकीत जिल्ह्यातील तेर, तुळजापूर आणि नळदुर्ग या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्राचीन काळात रोम…

  • लोकसेवा पुरस्काराचे वितरणपुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    धाराशिव / प्रतिनिधी प्रसिद्धी पासून दूर राहून अनेकजण समाजाची निरपेक्षपणे सेवा करतात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून केलेले त्यांचे कार्य खरोखरच पुरस्कारास पात्र आहे. पुरस्कार मिळालेल्यांचे हे कार्य समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा समिती , धाराशिव यांच्यावतीने…

  • मांजरा शुगर कंचेश्वर कारखान्यात ऊसतोड मजूर व कामगारांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर (कंचेश्वर ) इंडस्ट्रीज प्रा.ली या कारखान्याच्या गाळप हंगाम 2025 – 26 महाराष्ट्राचे माजी मंत्री व सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे. गाळप हंगामात कामावर असलेल्या ऊस तोडणी मजूरर व कारखाना कर्मचाऱ्यांकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ व कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने…

  • कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतुन भटके समाजाचे अनेक प्रश्न मार्गी — रा.स्व. संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी

    धाराशिव / प्रतिनिधी भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नामुळे भटक्या समाजातील वर्षानुवर्षे खितपत पडलेले प्रश्न प्रशासन अन सरकार पुढे उजेडात आणल्यामुळे मार्गी लागले आहेत. शासनाचे भटके विमुक्त समाजाकडे लक्ष गेले आहे. भटके विमुक्तांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांमधून यमगरवाडीचा सेवा प्रकल्प उभा राहिला. व यशस्वीपणे भटके विमुक्तांच्या सामाजिक व शिक्षणात आज काम करत आहे. इथे…