धाराशिव / प्रतिनिधी नियोजित लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग अधिक फायदेशीर आणि सोयीचा व्हावा, यासाठी या महामार्गाची आखणी लातूर–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण अशा सुधारित मार्गाने करण्याची ठोस मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदारांनी सविस्तर…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद अध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळून जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक नगराध्यक्ष व विक्रमी संख्येत नगरसेवक विजयी झाले. या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा नेते व धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन…
तुळजापूर / प्रतिनिधी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवार दिनांक 28 डिंसेबर रोजी दुपारी बारा वाजता गणेश विहारात घटस्थापना करण्यात येवून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली आणि सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली.…
नळदुर्ग / अणदूर – प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील केशेगाव शेतातील सर्वे नंबर पन्नास मधील मारलेल्या बोअरची बिघाडलेली मोटार बाहेर काढण्यासाठी हात कप्पीचा वापर करून पाण्याची मोटार काढत असताना कप्पी लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीवर गेल्याने कप्पी खाली पडेल या भितीने ती कप्पी पकडण्यासाठी गेलेल्या चौघांना विजेचा शाॅक लागल्याने चौघेही जागेवरच दगावल्याची दुर्दैवी घटना दिनांक २७ डिसेंबर रोजी…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विनोद (पिटू) गंगणे यांची जनतेतून बहुमताने तुळजापुर च्या नगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर श्री गंगणे हे उद्या सोमवार दिनांक 29डिसेंबर रोजी आपला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारणार आहेत. या पदग्रहण सोहळ्यास तुळजापुर तालुक्याचे आमदार तथा मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह देवीचे मुख्य महंत तुकोजी…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील तरुण संदीप वीरनाथ बचाटे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस प्रशासन सेवेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सत्र क्रमांक 126 अंतर्गत उपनिरीक्षक (PSI) पदाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून सेवेत दाखल झाले आहेत. आरळी बुद्रुक या ग्रामीण भागातून प्रथमच फौजदार…
भूम / प्रतिनिधी भूम नगरपालिका निवडणुकीत आमच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन अहोरात्र प्रयत्न केले, तरीही जनतेने आम्हाला ५१ टक्के कौल देऊन विरोधकांना चपराक लगावली आहे. सात हजारांहून अधिक मते मिळवून नगराध्यक्षपद आणि सहा नगरसेवक निवडून दिल्याबद्दल आम्ही मतदारांचे ऋणी आहोत. जरी आमच्या १४ जागांवर पराभव झाला असला, तरी त्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करून नवनिर्वाचित अध्यक्षांच्या…
परंडा / प्रतिनिधी संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे गणित मॉडेल प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतच्या एकूण 372 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गणितातील संकल्पना प्रत्यक्ष मॉडेलद्वारे सादर केल्या. या प्रदर्शनात भूमिती, बीजगणित, त्रिकोणमिती, क्षेत्रफळ–घनफळ, अपूर्णांक, टक्केवारी, गणितीय सूत्रे, दैनिक…
धाराशिव / प्रतिनिधी नगरपालिका निवडणूकीतील दैदिप्यमान यशानंतर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपा महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपाची जोरदार राजकीय रणनिती सुरु आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मा.उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचा आढावा घेत आहेत नुकतेच त्यांनी खामसवाडी ता. कळंब येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेऊन निवडणूकपूर्व…
भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन अणदूर /चंद्रकांत हगलगुंडे महाराष्ट्र-कर्नाटक- आंध्र प्रदेशसह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा देवाचा यात्रा महोत्सव दि. २ ते ४ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. “येळकोट येळकोट जय मल्हार” जयघोषाने आणि भंडाऱ्याचे मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या नळदुर्ग परिसर सुवर्णमय होण्यासाठी सज्ज झाला…