तुळजापुर / प्रतिनिधी चिकमहुद, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील भाविक शहाजी रामचंद्र जाधव हे आज सकाळी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवीच्या दर्शनानंतर जाधव दांपत्याने भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ७ लाख २७ हजार रुपये किमतीचे, ५१.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा यथोचित…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग (ता.तुळजापूर) नगरपालिकेची निवडणूक होऊन भारतीय जनता पक्षाने घवघवित यश संपादन केल्यानंतर सोमवार (२९) रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले बसवराज अप्पा धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पालिकेच्या प्रांगणात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता,मंचावर आ.राणाजगजितसिंह पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, याप्रसंगी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,नळदुर्गच्या…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा आज ज्याठिकाणी आहे, तिथवर तो आणण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. त्यात छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते भुजंगराव नलावडे यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. शिक्षण, क्रीडा, साहित्य आणि समाजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी असाच होता. जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना ते कधीच थकत नसत खऱ्या अर्थाने भुजंगराव नलावडे म्हणजे कौतुकसप्तर्षीच…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे यांचा पदग्रहण समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जि.प.च्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील उपस्थितीत होत्या. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने आणि कटिबद्धतेने काम करण्याच्या अपेक्षा यावेळी आ. राणादादांनी व्यक्त केल्या आणि त्यांना भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व पक्षाच्या…
मुरुम ( म. नेता ) उमरगा नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष किरण उषाताई रविंद्र गायकवाड यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार सत्कारासाठी हार-तुरे न देता, मा.आमदार तथा शिवसेना नेते ज्ञानराज चौगुले यांनी “महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५” हे पुस्तक भेट देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आघाडीच्या वतीने जनतेचा विश्वास संपादन करून विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक…
तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या सर्वागीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबध्द आहे. शहराच्या चोहुबाजुने सर्वागीण विकासासाठी आपले प्रयत्न असून नगरपालिकेचा कारभार गतीमान , स्वच्छ आणि पारदर्शक पध्दतीने करणार आहोत शहर विकासासाठी नागरिकांनी आपल्या सुचना द्याव्यात असे आवहान आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुर शहरवासियांना केले. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद (पिटूभैय्या) गंगणे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील रोहित बागल यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) आजीव सदस्यपदी (Life Member) निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यासह ग्रामीण भागात क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.या निवडीमुळे रोहित बागल यांना आता राज्याच्या क्रिकेट धोरणांमध्ये आणि प्रशासकीय निर्णयात सक्रिय सहभाग घेता येणार आहे. धाराशिवसारख्या भागातील क्रिकेटपटूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सर्व विजयी नगरसेवक तसेच उमेदवारांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,…
धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीचा आशिर्वाद व तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख समर्थ नेतृत्वाखाली व समस्त तुळजापुरकरांची निवडणूकीत मिळालेली साथ यामुळे माझ्यासह तुळजापुर नगरपालिकेत भाजपाची सर्व टीम निवडून आली आहे. उद्या सोमवारी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार घेऊन आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने कारभारास सुरुवात करणार आहोत. नागरिकांचा देखील आशीर्वाद आमच्या पाठीशी असणे…