Live News…..Breaking News!

.

  • जि.प. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  तुळजापुरात राष्ट्रवादी (शरद पवार )पक्षाची बैठक संपन्न

    तुळजापुर / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीची रणनिती ठरविण्यासाठी आज दिनांक 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक तुळजापुर येथील पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ नेते ,पदाधिकारी , कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. बैठकीस एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी युवतीच्या नेत्या सक्षणाताई…

  • धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव विमानतळ आता केवळ फ्लाइंग ट्रेनिंगपुरते मर्यादित न राहता मेंटेनन्स-रिपेअर-ओव्हरहॉल (MRO) प्रकल्प ,पार्किंग सुविधा व प्रवासी सेवे बरोबर कृषी निर्यात कार्गो टर्मिनलसह बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठी औद्योगिक गुंतवणूक, कृषी मालाची थेट हवाई निर्यात, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला भरीव चालना मिळणार आहे. भविष्यात धाराशिव विमानतळ…

  • परंडा भाजपाच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन

    परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, परंडा तालुकाच्या वतीने नुतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर  आगामी नूतन वर्ष २०२६ ची भारतीय जनता पक्षाची दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपर्क कार्यालय, परंडा येथे करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, अल्पसंख्याक…

  • नूतन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा तुळजापूरात भव्य सत्कार

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विनोद (पिटूभैय्या) गंगणे व नगरसेवकांच्या भव्य सत्कार भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला . तुळजापूरच्या जनतेने दाखवलेला विश्वास, भारतीय जनता पक्ष आणि लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भक्कम पाठबळावर विनोद (पिटुभैय्या) गंगणे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. तुळजापूर…

  • लातूर–कल्याण–जनकल्याण द्रुतगती मार्ग कळंब मार्गे व्हावा या जनतेच्या मागणीला अ‍ॅड. व्यंकट गुंड-पाटील यांचा पाठिंबा

    धाराशिव / प्रतिनिधी नियोजित लातूर–कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा लातूर–कळंब–अहिल्यानगर–कल्याण या प्रमुख मार्गानेच नेण्यात यावा, अशी ठाम मागणी कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मागणीला रुपामाता उद्योग समूह, धाराशिवचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकट गुंड-पाटील यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी व…

  • वेलनेस  कॉलेज ऑफ  फिजिओथेरपी धाराशिव  येथे  इंडक्शन  प्रोग्राम  उत्साहात  संपन्न

    धाराशिव  / प्रतिनिधी  व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला इंडक्शन (परिचय) प्रोग्राम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रभारी प्राचार्य डॉ. पूजा आचार्य यांनी महाविद्यालयाचे नियम, शिस्त तसेच शैक्षणिक वातावरणाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. सचिन टिक्के (प्रमुख, पंचकर्म विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय) यांनी फिजिओथेरपीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, या क्षेत्रातील वाढती गरज व भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री. अमर कवडे यांनी कॅम्पसची रचना, उपलब्ध सुविधा व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी- सुविधांचा आढावा घेतला. तर डॉ. गणेश गोरे यांनी परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासाची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी प्रेरणा देवरे व रिया शिंदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. महिमा चाकवते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे सर्व विद्यार्थी तसेच डॉ. पूजा आचार्य, डॉ. गणेश गोरे, डॉ. महिमा चाकवते, डॉ. स्वतेजा चोपडे, डॉ. समृद्धी मेहेत्रे, डॉ. तेजश्री सोलवट, डॉ. प्रतीक गमरे, वरिष्ठ लिपिक कृष्णा दळवी,  मंगल कोरे व संग्राम क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.

  • सरत्या वर्षात विकासाला फुटली पालवी, नवीन वर्षात वृक्ष बहरणार!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात शाश्वत विकासाची विविध कामे सुरू, नकारात्मक चर्चेला लागला ब्रेक

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव बदलत आहे. सरलेले २०२५ हे वर्ष धाराशिवसाठी विकासाच्या अनेक योजना घेऊन आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या आशा-अपेक्षांना पालवी फुटली. नवीन वर्षात हा वृक्ष बहरत असल्याचे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्स्फॉर्मेशनचे अर्थात मित्रचे उपाध्यक्ष. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची पावले झपाझप पडत आहेत. सोलापूर – तुळजापूर – धाराशिव…

  • हजारो महिला भगिनींच्या सहभागाने तुळजापुरात भव्य जलयात्रा उत्साहात संपन्न

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्रोत्सव २८ डिसेंबरपासून अत्यंत भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या पवित्र उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेली भव्य जलयात्रा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. हजारो महिला भगिनींच्या सहभागाने निघालेल्या या जलयात्रेमुळे संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीचा ‘शाकंभरी’ अवतार पौष शुक्ल…

  • धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरीपालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

    धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची “उडान (RCS)” योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री…

  • श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम; अर्पण केलेल्या फुलांपासून सेंद्रिय अगरबत्तीची निर्मिती

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करून निर्माल्याचे पावित्र्य जपणारा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राबविण्यातस सुरुवात करण्यात आली आहे. दररोज देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून हजारो भाविक तुळजापूरात येतात. दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या भक्तिभावाने देवींच्या चरणी फुले अर्पण करतात.…