Live News…..Breaking News!

.

  • पर्यटन विकास, रोजगार निर्मितीवर भर देणार — आ. राणाजगजितसिंह पाटीलअणदूर येथील विविध विकास कामाचे लोकार्पण

    अणदूर ( म.नेता ) कृष्णा खोरेच्या हक्काच्या पाण्यासाठी पंधरा हजार कोटीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत पाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान दुप्पट करण्याबरोबरच उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित करून रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटन विकासावर अधिकाधिक भर देण्याची ग्वाही मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. अणदूर येथील अण्णा चौकात प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत सिमेंट रस्ता व पथदिवे…

  • ज्येष्ठ पत्रकार अंबादासराव पोपळे यांना दर्पण रत्न पुरस्कार प्रदान

    तुळजापुर / प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघा च्या वतीने आयोजित दर्पण रत्न पुरस्कार 2026 चा पुरस्कार वितरण कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे दि. 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार…

  • युती व अंतिम उमेदवार निवडीचे अधिकार जिल्हा कोअर कमिटीला – मा. आ. सुजितसिंह ठाकूर

    भूम / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आदर ठेवूनच समविचारी पक्षा बरोबर युती करण्याचा आणि अंतिम उमेदवार निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमिटी घेईल, कसल्याही स्थितीत प्रत्येक गड जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन विधान परिषदेचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर यांनी केले यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी देखील कार्यकर्त्यांच्या…

  • प्रा. डॉ. आ. तानाजी सावंत यांचे आवाहन — शिवजयंतीतून समाजसेवेचा जागर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी धाराशिवमध्ये सामुदायिक विवाह सोहळा

    धाराशिव / प्रतिनिधी केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी सर्वधर्मीय, बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४–२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. आर्थिक अडचणींमुळे मुलामुलींचे…

  • अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस प्रचंड जनसाक्षीने साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रुपामाता उद्योग समूह, धाराशिवचे संस्थापक व मार्गदर्शक अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस दिनांक ५ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात व प्रचंड जनसाक्षीने साजरा करण्यात आला. समाजाच्या विविध स्तरात त्यांचे असलेले योगदान, कार्यपद्धती व नेतृत्व यामुळे वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या प्रसंगी…

  • नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव

    परंडा / प्रतिनिधी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, परंडा नगरपरिषद कार्यालयात दि. ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या शुभहस्ते दैनिक तरुण भारत व मराठवाडा नेता तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह शहरातील पत्रकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.यावेळी…

  • परंडयात मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार

    परंडा / प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन ‘मराठी पत्रकार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक रमेशसिंह परदेशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, निशिकांत क्षिरसागर, युवा…

  • असंघटीत महिलांसाठी सहकारी पतसंस्था ही काळाची गरजश्रमिक महिला पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

    धाराशिव / प्रतिनिधी असंघटित श्रमिक महिलांच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. श्रमिक महिलांनी सहकारच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी व्हावे. त्यासाठी श्रमिक महिलांच्या पतसंस्था ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गवारे यांनी केले. श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार, 5 जानेवारी…

  • पराभवाने खचून जावू नका जनतेच्या कामात राहा यश  जवळच आहे   – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    तुळजापुरात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा सत्कार धाराशिव / प्रतिनिधी          तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या तसेच पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी निवडून आलेल्या उमेदवारांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत…

  • आ. राणादादा व नगराध्यक्ष धरणे यांच्या उपस्थितीत मैलारपूर यात्रेत कुस्त्यांचे आयोजन

    नळदुर्ग / प्रतिनिधी मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवार (ता.४) रोजी सायंकाळी भव्य कुस्तीची दंगल संपन्न झाली. यावेळी मित्रा चे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील , नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे आदिसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक दत्तात्रय दासकर व नय्यर जागीरदार यांच्यावतीने एक लाख पन्नास हजार रुपयांची कुस्ती तर नगरसेविका अपर्णा बेडगे,ऍड.अरविंद…