धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशान्वये नगरपालिकेचे ₹ २ कोटी वाचणार…
धाराशिव / प्रतिनिधी श्री क्षेत्र तुळजापुर येथील तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य विकास आराखड्याला शासनस्तरावर वेग मिळाला असून,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पातील कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या विकास आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली.…
नळदुर्ग / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील इंदिरा गांधी विद्यालय या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवार दि ७ रोजी विद्यालयात संपन्न झाला. सन २०००-०१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी तब्बल पंचेवीस वर्षांनी एकत्र जमले. यावेळी सर्वांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्याची सुरू असलेली वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा केली. माजी विद्यार्थीनी छबु मुसळे हिने भारूडे…
धाराशिव / प्रतिनिधी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारावे व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत आजपर्यंत सात तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडल्या असून आज धाराशिव तालुक्याची कार्यशाळा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा परिचारिका प्रशिक्षण सभागृहात उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे…
धाराशिव / प्रतिनिधींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी चे व्हॉइस चान्सलर डॉ. काळे यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील व विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या कौशल्य विकासाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रसंगी, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी अतिथ्य करून महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्र, विविध प्रयोगशाळा (अँपल लॅब, ड्रोन सेन्टर, सिस्को सेन्टर,…
धाराशिव / प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आणीबाणीचे ते दिवस या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर जिल्हा कार्यवाह श्री अजय जानराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन करताना संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रचार विभागाच्या वतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचा…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव आयोजित अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सन 2025- 26 चे आयोजन दिनांक 8 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांचे…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक ७ रोजी पारंपरिक पद्धतीने गोदानाचा धार्मिक व भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कुटुंबीयांनी श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपत हा पुण्यकार्यातील सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी व…
धाराशिव / प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक ०१/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मांजरा साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली. वायुवेग पथक क्र.२ मधील मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केंबळे व सहायक…
धाराशिव / प्रतिनिधी दाऊतपूर, ता. धाराशिव येथे सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या सुसज्ज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मा.उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य उपकेंद्रामुळे दाऊतपूर व परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, मातृ-बाल आरोग्य सेवा, लसीकरण तसेच विविध आरोग्य तपासण्या गावातच आणि वेळेत उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना…