Live News…..Breaking News!

.

  • इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” चे यशस्वी आयोजन उद्योग–शासन–नवोन्मेष यांचा प्रभावी संगम

    धाराशिव   /  प्रतिनिधी राज्यातील नवउद्योजक,उद्योग क्षेत्र आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ चे यशस्वी आयोजन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यावेळी अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी श्री.पुजार उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,भूम व परंडा तालुक्यातील उत्पादित केळी व तुळजापूर तालुक्यातील द्राक्ष हे कृषी उत्पादने निर्यात होत…

  • रा गे शिंदे महाविद्यालयात विश्व हिंदी दिन उत्साहात साजरा

    परंडा   /  प्रतिनिधी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने  उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे , मराठी विभाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदिल,  वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अरून खर्डे , हिंदी…

  • दुचाकी वाहनाच्या विळख्यात हरवली तुळजापुरातील पंढरपूरकर गल्ली

    तुळजापूर   /  प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरातील  श्री तुळजाभवानी मंदिरालगत असणाऱ्या पंढरपूरकर गल्लीत दुचाकी वाहनांचा विळखा निर्माण झाला असून. या दुचाकी वाहनाच्या विळख्यात पंढरपूरकर गल्ली हरवली आहे. या गल्लीतील परिसरात अरुंद रस्त्यावर अनाधिकृत रित्या  २४ तास दुचाकी वाहनांमुळे लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंढरपूरकर गल्ली परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुचाकी वाहनाच्या अनाधिकृत पार्किंगमुळे घरी ये…

  • नळदुर्ग ब्राम्हण समाजाच्या अध्यक्षपदी मुकुंद नाईक यांची निवड

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील प्रतिष्ठीत अलंकार व्यापारी मुकुंद नाईक यांची ब्राम्हण समाजाच्या नळदुर्ग अध्यक्षपदी निवड झाली आहे,तर सचिवपदी संदीप वैद्य यांची निवड करण्यात आली आहे याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुकुंद नाईक हे अनुभव संपन्न नेतृत्व, प्रामाणिक विचारसरणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावाचे असल्याने  ब्राम्हण समाजाने विश्वास दाखवून ही निवड केली आहे. समाज…

  • श्री तुळजाभवानी देवींची सिंहासन पूजा फेब्रुवारी २०२६ ची ऑनलाईन नोंदणी २० फेब्रुवारी पासून

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची फेब्रुवारी – २०२६ मधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी. असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत श्रद्धेने केली जाणारी…

  • अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी व्यापक कृती समिती लोकसहभागातून भव्य स्मारक — आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील…

  • धाराशिव – तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाची आ. राणादादांनी केली पाहणी

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र तुळजापुर , रेल्वे मार्गाने जोडण्याचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा क्षण जवळ येत आहे. सध्या हे काम वेगाने प्रगतीपथावर सुरु आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी मित्र चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी रेल्वे…

  • “नो व्हिस्की नो बियर”च्या घोषणेत येडाई व्यसनमुक्ती केंद्रात गुणगौरव पुरस्कार २०२५ उत्साहात साजरा

    कळंब / प्रतिनिधी येडाई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, येरमाळा येथे ३१ डिसेंबर २०२५ रोजी “व्यसनमुक्ती गुणगौरव पुरस्कार २०२५ ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या परिवर्तनवादी रुग्ण मित्रांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव,येरमाळा…

  • नळदुर्ग शहराच्या बाजार पेठेतील अडचणी दूर करणार — नगराध्यक्ष धरणे

    ​नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहराच्या बाजार पेठेतील अडचणी दूर करून बाजारकरू,व्यापाऱ्यांसाठी पिण्यासाठी पाणी , स्वछतागृहाची व्यवस्था करणार आहे याचा विशेष लाभ महिलांना ही होणार आहे असे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले . येथील शहर व्यापारी मंडळाच्यावतीने नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पत्रकारांचा सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील मल्लिकार्जुन मंदिरात करण्यात आले होते. या प्रसंगी नगराध्यक्ष बसवराज धरणे…

  • वक्तृत्व कलेमुळे वाचनाची व अभ्यासाची रुची निर्माण होते – मा.आ.सुजितसिंह ठाकूरस्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा कु. धस प्रणाली शहाजी व कदम आरव प्रवीण मानकरी

    तुळजापूर / प्रतिनिधी वक्तृत्व स्पर्धेतून लहान वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची व अभ्यासाची रुची निर्माण होते.व नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होते ही संधी तुळजापूर येथील शाकंभरी नवरात्रोत्सव च्या माध्यमातून आपणास मिळत आहे. भविष्यात आपण आपल्या नेतृत्वाची चूनक दाखवा अशी अपेक्षा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था यांच्यावतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव…