Live News…..Breaking News!

.

  • स्व. आमदार साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुस्काराचे मंगळवारी वितरण

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्याचे माजी आमदार स्व. साहेबराव आबा हंगरगेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापुर व स्व. साहेबराव आबा हंगरगेकर फांऊडेशनच्या वतीने दिला जाणारा , स्व. साहेबराव आबा हंगरगेकर साहित्य पुरस्कार २०२६ हा पुरस्कारयावर्षी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष विनोद…

  • काकांच्या नेतृत्वाला जनतेची साथ — शरण पाटीलनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूराव पाटील यांचा विशेष सत्कार

    मुरूम ( म. नेता ) शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कै. काकांचे स्वप्न साकार करण्याकरिता बापूराव काकांनी जनतेच्या प्रेमापोटी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. कै. काकांनी अनेक वर्षे नगरपालिकेचे नेतृत्व केले. तीच परंपरा पुढे नेत नगराध्यक्षपदाचा राजकीय वारसा पुढे बापूराव पाटलांच्या रूपाने लाभला. त्यामुळे शहराच्या राजकारणात माधवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचे सामर्थ्य काकांमध्ये आहे.…

  • सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खेळ महत्वाचा – सचिन इगे

    धाराशिव / प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या क्षेत्राविषयी पालकांची जागरूकता वाढलेली असली तरी फक्त करियर म्हणूनच नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे आवश्यक असल्याचे मत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी व्यक्त केले. राज्य क्रीडा दिन निमित्त धाराशिव जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा…

  • चार कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपयांचे ऊसाचे बील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा — नानासाहेब पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एनव्हीपी…

  • गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात…

  • उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर यांचा रुपामाता परिवाराच्या वतीने सत्कार.

    धाराशिव / प्रतिनिधी परंडा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी समरजितसिंह (भैय्या) ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल परंडा येथे त्यांचा औपचारिक सत्कार रुपामाता उद्योग समुह व परिवाराचे संस्थापक अँड व्यंकटराव गुंड , व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. समरजितसिंह ठाकूर हे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र असून परंडा पालिकेतील जनशक्ती नगर विकास…

  • हळदी – कुंकू कार्यक्रमात दरेकर कुटुंबाचा “एक कुटुंब एक वृक्ष” संकल्पनेचा उपक्रम

    तुळजापूर / प्रतिनिधी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या असताना, तुळजापूर शहरात संकल्प प्रतिष्ठान व धैर्यशील दरेकर मित्रपरिवार यांच्यावतीने “एक कुटुंब – एक वृक्ष” हा उपक्रम प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन घडवत आहे. घर तेथे वृक्ष या संकल्पनेमुळे नागरिक थेट पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात सहभागी होत आहेत.एका छोट्या उपक्रमातून झालेली सुरुवात ते आजपर्यंत तुळजापूर शहरात १,०००…

  • तुळजापुर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांतराचे सोहळे धाराशिव जिल्ह्यात वेगात सुरु आहेत. प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीत विविध समाजघटकांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्याचा ओघ सातत्याने सुरू असून, पक्षाची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. याच पार्श्वभूमीवर आपसिंगा, ता. तुळजापूर येथील शिवसेना उबाठा गटाच्या शिव अल्पसंख्याक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमीरभाई…

  • नळदुर्ग पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नय्यर जहागीरदारस्विकृत सदस्यपदी गायकवाड , पोतदार यांची निवड

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (ता.१६) रोजी बोलावण्यात आली होती. या सभेत उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नय्यर जहागीरदार हे तीन मतांनी विजयी झाले . त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मारुती खारवे यांचा पराभव केला. वीस नगरसेवक असलेल्या सभागृहात…

  • धाराशिव च्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे अक्षय ढोबळे यांची बहुमताने निवडस्विकृत सदस्यपदी साळुंके , राजेनिंबाळकर ,भोसले व पाटील यांची निवड

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणूकीनंतर आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी पहिल्या सर्वसाधारणपणे सभेत पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष नेहाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडली. अपेक्षेप्रमाणे पालिकेत बहुमत असलेल्या भाजपाचे नगरसेवक अक्षय ढोबळे यांची उपनगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अक्षय…