Live News…..Breaking News!

.

  • तेर जिल्हा परिषद गटात अर्चनाताई पाटील यांचा झंझावती प्रचारडोअर टू डोअर मतदारांशी संवाद

    तेर ( म. नेता ) तेर जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचा झंझावती प्रचार सुरु असून उमेदवार अर्चनाताई या घरोघरी जाऊन जि.प. गटातील मतदारांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी मुळेवाडी गावास भेट देत घरोघरी मतदारांशी सविस्तर संवाद साधला. केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची स्पष्ट दिशा मांडत,…

  • महायुती सरकारच्याच काळात जिल्हयातील विकासकामांना गती – आ. राणाजगजितसिंह पाटील

    सांजा येथील सभेत विकासासाठी महायुतीच्या उमदेवारांना विजयी करण्याचे आवहान धाराशिव / प्रतिनिधी सांजा जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सांजा येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आ.पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. व माजीमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या सिंचन क्षेत्रातील ऐतिहासिक कामामुळे सांजा परिसरातील शेतांमध्ये पाणी खळाळू…

  • प्रसन्न जीवन जगण्यास योग, ध्यान व प्राणायाम अवलंब करणे आवश्यक- स्वामी ब्रह्मचैतन्य

    धाराशिव / प्रतिनिधी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग व्याख्याते स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी “शारीरिक व मानसिक आरोग्य” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले. मत्सर सोडा, प्रगती साधा स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात मानवी स्वभावावर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की, “आज काही माणसांना दुसऱ्याची प्रगती…

  • विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावरच निवडणूक लढवणार – खा ओमराजे निंबाळकर

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांजा, आंबेजवळगे, कसबे तडवळे व येडशी (ता. धाराशिव) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाल्या. या सभांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना खासदार…

  • डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भरमहायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. गावातील प्रत्येक शाळा डिजिटल करून गावात विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल यासोबतच पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीवर आपला भर असणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती…

  • शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याचा महायुती सरकारचा संकल्प – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    ढोकी / प्रतिनिधी. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, यांच्या समवेत ढोकी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या जाहीर सभांमध्ये…

  • स्व. अजितदादांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेताना तेरवासियांचे डोळे पाणावले

    तेर (म. नेता) धाराशिव तालुक्यातील तेर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेताना अनेकांचे डोळे पाणावले. तेर येथे माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी स्व.अजितदादा पवार यांचा अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थितांचे व तेरवासियांचे अस्थी कलशाचे दर्शन घेताना डोळे पाणावले. स्व अजितदादा हे तेर चे जावाई होते. त्यांच्या अस्थीचे तेरणा…

  • जाहीरनामा नव्हे वचननामा – खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर

    धाराशिव / प्रतिनिधी शेती, शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठोस विकासाचा आराखडा हाच आमचा अजेंडा असून, केवळ घोषणा नव्हे तर परिणामकारक अंमलबजावणी हेच आमचे धोरण आहे. असे मत शिवसेना ( उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर व जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना (उबाठा ) पक्षाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या…

  • पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा नगरपंचायतींच्या वतीने सत्कार

    लोहारा / प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे लोहारा शहरात आगमन होताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोहारा नगरपंचायतींच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, नगरपंचायतींच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे,…

  • तुळजापुर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करणार – सभापती सागर कदम

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला स्वच्छ व निर्जंतुकीकरण पाणी पुरवठा करण्याचा नवनिर्वाचित नगरपालिका पाणी पुरवठा सभापती सागर कदम यांनी संकल्प व्यक्त केला. आज मंगळवारी तुळजापूर शहरातील पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र तसेच मंगळवार पेठ येथील पाणीपुरवठा विभाग व शुक्रवार पेठ येथील पाणी पुरवठा विभाग येथे नूतन सभापती श्री कदम यांनी पाहणी केली. शहरास बोरी धरणातून येणारे…