Live News…..Breaking News!

.

  • बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा निवडणूकीच्या अनुषंगाने लोहारा येथे विधीज्ञ मंडळाची बैठक

    धाराशिव / प्रतिनिधी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा च्या होऊ घातलेल्या 2026 च्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाला आज रोजी धाराशिव येथील विधीज्ञ मंडळीनी भेट दिली. सर्व विधीज्ञानी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. वचने तसेच तेथील सर्व विधीज्ञानी एकमताने त्यांच्या बारचा ठराव घेऊन अँड. अविनाशराव नरसिंगराव देशमुख काटीकर यांना पाठिंब्याचा ठराव देऊन पुढील…

  • श्री विघ्नेश्वर विनायक मंदिराचा वर्धापन दिन उमरगा येथे साजरा

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री विघ्नेश्वर विनायक मंदिर स्थापनेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. कथाकार प्रशांत महाराज तोरे (बामणीकर) यांनी सलग तीन दिवस श्री गणेश पुराण कथेतून श्री गणेशाचे सतत स्मरण केल्याने समबुद्धी प्राप्त होते व सात्त्विक आचार करण्यास प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करीत महादेव-पार्वती यांचे माहात्म्य…

  • जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ ‘कोरडे दिवस’ ; मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद

    धाराशिव / प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद धाराशिव तसेच धाराशिव,कळंब,भूम,परांडा,वाशी, तुळजापूर,उमरगा व लोहारा या ८ पंचायत समिती सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात…

  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव ठरले अव्वल

    धाराशिव / प्रतिनिधी आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नविन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत एकूण २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून शासनाकडे तब्बल ३ कोटी ७४ लाख २५ हजार २११ रुपये इतकी विमा रक्कम…

  • डाँ सरोजनीताई राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधीर विद्यालयात शालेय साहित्य व मिठाईचे वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी श्रीलक्ष्मी सेवाभावी संस्था हसेगाव (शि)ता.कळंब जि. धाराशिवच्या अध्यक्षा डॉ. सौ. सरोजनीताई राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब येथील संत ज्ञानेश्वर म.निवासी मूकबधीर आश्रम शाळेत शालेय साहित्य तसेच मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी केले. त्यांनी डॉ. सौ. सरोजनीताई राऊत यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या…

  • मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गणासाठी आज मतदान

    मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 55 गटासाठी व पंचायत समितीच्या 110 गणासाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध गावातील मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मागील पंधरा दिवस सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी काल संपली. उद्या शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीतील…

  • समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये ६१ रक्तदात्यांचे रक्तदान

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील गेल्या २५ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणून अग्रेसर असणारी आणि गरजू रुग्णांसाठी ब्लड बँक म्हणून अशी वेगळी ओळख असणारी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने संस्थेच्या वतीने दिनांक २ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संस्थेचे…

  • शेळगाव गटात भाजपाची तोफ धडाडली !धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकणार – मा. आ. सुजितसिहं ठाकूर

    परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकणार आहे असा ठाम विश्वास भाजपाचे नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. परंडा तालुक्यातील शेळगाव गटात आज बुधवारी जिल्हा परिषदेचे भाजपा उमेदवार शरद रामदास पवार व पं स. गणातील उमेदवार एकनाथ वायसे यांच्या प्रचारार्थ भाजपा आमदार सुरेश धस व भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर…

  • मराठवाडयाचा दुष्काळी शिक्का दूर करण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    जेवळी येथे प्रचार सभा धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यावर कायमचा दुष्काळी असा बसलेला शिक्का कायमचा दूर करण्यासाठी महायुती सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मराठवाडा वाँटर ग्रीड ही योजना महाविकास आघाडीने बंद केली होती परंतु राज्यात आमचे महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा ती योजना सुरु केली असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोहारा तालुक्यातील जेवळी येथे…

  • सामान्य माणसांच्या उपयोगी पडणाऱ्या शिवसेनेच्या अँड तुकाराम शिंदे यांना साथ द्या – पालकमंत्री सरनाईक

    ढोकी / प्रतिनिधी. ऐंशी टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे त्यामुळे सर्व सामान्यतः माणासांच्या नेहमीच उपयोगी पडणाऱ्या ढोकी पंचायत समिती गणातील शिवसेनेचे उमेदवार अँड. तुकाराम शिंदे यांना या निवडणूकीत विजयी करा असे आवहान राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. पालकमंत्री सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील ढोकी…