धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी 3 बाय 2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ‘ हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या…
छत्रपती संभाजीनगर येथे होणार तीन दिवस साहित्याचा उत्सव धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या दि.20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्योसवाच्या स्वागताध्यक्षपदी इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य भारती देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे हा साहित्योसव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाची…
परंडा / प्रतिनिधी संतकृपा ही जीवनातील सर्वात मोठी कृपा असते. थोर संत हे कल्पतरुप्रमाणे असतात.मनुष्य जीवनाला योग्य दिशा देऊन त्याला उत्तम दशेला प्राप्त करुन देण्यासाठी संतानी महान कार्य केले आहे. प्रगटदिन सोहळा साजरा करुन संतानी दिलेली शिकवण सर्वानी आपल्या आचरणात आणावी असे मत ह.भ.प. धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांनी व्यक्त केले.परंडा शहरात विविध ठिकाणी श्रीसंत…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदच्या व जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज शनिवार दिनांक 07 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भयी वातावरणात पार पडली. राज्यातील पालिका व महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीमध्ये मतदानाची अपेक्षित टक्केवारी वाढल्याचे दिसून आले नाही. दुपारी साडेतीन पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील…
धाराशिव / प्रतिनिधी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले.यानिमित्ताने नागरिकांमध्ये मतदानाबाबत जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व प्रादेशिक वन विभागामार्फत जिल्ह्यात “हरित मतदान केंद्र” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील शेकापूर प्राथमिक शाळा आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगावडी प्राथमिक शाळा येथे हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली.या मतदान…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवार दि.७ रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 51.24% मतदान झाले. मतदान प्रक्रिया २३० मतदान केंद्रावर शांततेत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ९ जागेसाठी ३१ उमेदवार व पंचायत समितीच्या १८ जागेसाठी ६६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सोमवार दिनांक ९फेब्रुवारी रोजी मतमोजणी येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातसंपन्न होणार आहे. जिल्हा…
धाराशिव / प्रतिनिधी आज दिनांक 07 फेब्रुवारीरोजी जिल्हाधिकारी मा. कीर्तीकिरण पुजार व पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर ,परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी श्रीमती मेघना पाटील म, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव सर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती स्वाती शेंडे यांनी धाराशिव तालुक्यातील मौजे शेकापूर येथील हरीत धाराशिव या संकल्पनेतून साकारलेल्या आदर्श मतदान केंद्रास व मोजे सांजा येथील महिला…
अणदूर ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी वयाच्या 93 व्या वर्षीही लोकशाही प्रति निष्ठा कायम ठेवून मतदानाचा हक्क बजावला. हा आदर्श मतदारांना प्रेरणा देणारा म्हणावा लागेल.मधुकरराव चव्हाण हे अणदूर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती ते राज्याचे मंत्री, वैधानिक…
मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 55 गटासाठी व पंचायत समितीच्या 110 गणासाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध गावातील मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मागील पंधरा दिवस सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी काल संपली. उद्या शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीतील…
धाराशिव / प्रतिनिधी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते, यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, विविध विषयांवर आधारित कवितांचे सादरीकरण, पारंपरिक विषयावर आधारित नृत्य प्रदर्शन, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विचारांची मांडणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली,…