मुरुम ( म. नेता ) मुरुम येथे वीरशैव कक्कया महाराज यांच्या 921 व्या जयंती निमित्त शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आलेल्या मुरूम येथील वीर कक्कय्या महाराज सामाजिक सभागृहाचे उद्घाटन उमरगा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पार पडले. मुरुम येथील नेहरू नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या वीर…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी शहरात येत आहेत. या उमेदवारांची राहण्याची गैरसोय होऊ नये, या सामाजिक जाणिवेने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने धाराशिव शहरात उमेदवारांच्या निवासाची मोफत व्यवस्था केली आहे.,शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या ‘समर्थ मंगल…
तुळजापुर / प्रतिनिधी महाशिवरात्री निमीत्त तिर्थक्षेत्र तुळजापुर शहर व परिसरात विविध शिवमंदीरामध्ये भगवान श्री शिव शंकराच्या दर्शनासाठी आज रविवारी मोठी गर्दी केली होती, महाशिवरात्री निमित्त बालाघाटाच्या कुशीत गर्द वनराईत नटलेल्या श्री मुद्गलेश्वर मंदीरात श्री मुद्ग्लेश्वर महादेव सेवा समिती तुळजापूर यांच्या वतीने 1100 किलो शाबू खिचडीचे व 21, 000 राजगिरा लाडूसह, विविध फळांचा प्रसाद भक्तांना वाटप…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने यांचा अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा धाराशिव मधील स्वस्तिक मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला. या 75 व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवास महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज…
तुळजापुर / प्रतिनिधी तिर्थक्षेत्र तुळजापुरात हिवाळ्याची थंडी ओसरून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसेंदिवस सूर्याची तीव्रता वाढत असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा अधिकच त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.मंदिर परिसरात प्रवेश मार्ग तसेच भाविकांच्या…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड,धाराशिव येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत श्री साई जनविकास कृषी महाविद्यालयाचे मौजे शिंगोली येथे विशेष निवासी सात दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. योगिता…
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम…
किरण राजपूत कळंब महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्रेश्वर प्रिंप्री (ता. केज) येथील प्रसिद्ध महाशिवरात्री यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कळंब एसटी आगाराने विशेष नियोजन केले आहे. दि. १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चार दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी तब्बल २५ जादा बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती कळंब आगारप्रमुख विनोद अलकुंटे यांनी दिली. मागील २०२४-२५ वर्षी कळंब व परंडा…
धाराशिव / प्रतिनिधी सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आज दाखल झाले.या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली. भूम तालुक्यातील…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी दि. ११/०२/२०२६ रोजी वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात एका शेतक-याने लपून अफूची लागवड केलेली आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून पुढील कायदेशीर कारवाईकरीता मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव यांनी पोनि श्री विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना सुचित केले होते. त्यांनी…