Live News…..Breaking News!

.

  • तुळजापुर येथे श्री. तुळजाभवानी जिल्हा कृषि महोत्सवाचे दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार शुभारंभ महोत्सवात ६० दालनांचा समावेश धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उ‌द्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व वरिष्ठ कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा विभाग, कृषि विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त…

  • ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

    — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच धाराशिव / प्रतिनिधी राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी असा ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या…

  • श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न

    सर्वांगीण विकासासाठी क्रिडा स्पर्धांचे महत्त्व अनन्यसाधारण धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, खेळाडूवृत्ती, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज, धाराशिव येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. अभ्यासासोबतच खेळांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याने या क्रीडा सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.यावेळी प्राचार्य श्री. नंदकुमार नन्नवरे यांनी…

  • मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घातले तुळजाभवानी मातेस राज्याच्या प्रगतीचे साकडे

    तुळजापुर / प्रतिनिधी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बुधवारी श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवींची आरती करून राज्याच्या प्रगतीसाठी तसेच जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत…

  • तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. सचिन सगरे यांना भारत सरकारकडून पेटंट मंजूर “भूकंपरोधक शेअर वॉल” संशोधनाला राष्ट्रीय मान्यता; 

    तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन सगरे यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाल्याने महाविद्यालयाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. प्रा. सचिन सगरे यांनी सादर केलेल्या “Enhanced Load Carrying Capacity of Earthquake Resistant Shear Wall” या संशोधनास भारत सरकारच्या…

  • सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे पती सोबत दर्शन –

    सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भिडे वाडा चित्रपटासाठी घातले साकडे  तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी विधिवत पूजाआर्चा करत मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी मातेला साकडे घातले की मी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे , आई तुळजाभवानी तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी राहू…

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आर्य चाणक्य विद्यालयात सामान्य ज्ञान चाचणी

    धाराशिव / प्रतिनिधी हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाचा उजाळा शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना व्हावा या उद्देशाने धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेतील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनींनी या सामान्य ज्ञान चाचणीत सहभागी होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र तसेच त्यांच्या कार्य कर्तृत्वावर विचारलेल्या विविध प्रश्नांना…

  • बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष पवार

    विविध सामाजिक उपक्रमांसह भव्यदिव्य मिरवणूक – धनंजय शिंगाडे धाराशिव / प्रतिनिधी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर रामेश्वर पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्यालयात समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.15) झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची मिरवणूक…

  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

    तुळजापूर / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच कु. आरोही सुनील रोचकरी हिच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शहरात नागरिकांसाठी २६ फेबुवारी २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल व सुनील (भाऊ) चव्हाण विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे, शहरातील प्रभाग क्र. ४ मधील नागरिकांसाठी…

  • व्दितीय  गळीत हंगामात एनव्हीपी शुगरचा 1 लाख मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण

    ऊसबिल रक्कमही वेळेत शेतकर्‍यांच्या खाती जमा – चेअरमन नानासाहेब पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्याने व्दितीय गळीत हंगामात आजवर 1 लाख मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून ऊसबिलही वेळेत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक संकटावर मात करून गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे.…