Live News…..Breaking News!

.

  • डॉ. सर्फराज बशीर तांबोळी यांची डॉक्टर ऑफ फार्मसीनंतर पीएच.डी. पदवीची उल्लेखनीय कामगिरी

    धाराशिव / प्रतिनिधी के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सर्फराज बशीर तांबोळी यांनी डॉक्टर ऑफ फार्मसी (PharmD) नंतर पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी अलवर राजस्थान येथील सुनराईझ विद्यापीठातून डॉ विजय तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी संपादन केली त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशस्वी कामगिरीमुळे त्यांना महाराष्ट्रातील पहिले डॉक्टर ऑफ…

  • नवरात्रात तुळजाभवानी मातेचे चरणतीर्थ पहाटे १ वाजता

    भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानचा निर्णय; दर्शन सुलभ करण्यासाठी वेळेत बदल तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर नगरीत भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने चरणतीर्थ व सकाळच्या पूजेच्या घाटाच्या वेळेत बदल केला आहे.मंदिर संस्थानच्या…

  • लोहारा तालुक्यातील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

    लोहारा / प्रतिनिधी लोहारा तालुक्यातील होळी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कार्यकर्ते चंद्रहर्ष जाधव व अजित जाधव यांनी आपल्या सहका-यासमवेत भाजपा नेते आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे . यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे भाजप पक्षात मनःपूर्वक स्वागत करुन पक्षात प्रवेश देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघटन मजबूत करण्यासाठी…

  • तेर येथे अर्ध्या गुंठ्यातून केवळ 14 छटाक उत्पादन, शेतकरी चिंताग्रस्त

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात अर्ध्या गुंठा क्षेत्रातून केवळ १४ छटाक (सुमारे ७२० ग्रॅम) उत्पादन मिळाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष उत्पादनातून स्पष्ट झाली आहे. पावसातील मोठ्या खंडाचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम या प्रयोगातून अधोरेखित झाला. एपीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक…

  • शिक्षकांच्या समस्या, पदवीधरांचे प्रश्न; महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद दौरा.

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ विविध शैक्षणिक संस्थांना भेट देत शिक्षक बांधव आणि पदवीधरांशी संवाद साधण्यात आला. या दौऱ्यात शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी, पदवीधरांच्या समस्या, रोजगाराच्या संधी आणि पदवीधरांच्या हक्कांशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी शिक्षक व पदवीधर बांधवांशी…

  • सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश

    जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा धाराशिव / प्रतिनिधी नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली,पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा…

  • केंद्रीय युवक महोत्सवात रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे घवघवीत यश.

    परंडा / प्रतिनिधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘सपान’ या एकांकिकेतील पुरुष अभिनयासाठी ज्ञानेश्वर बागडे याने तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव…

  • राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल

    ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे व २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील पथकाकडून यशस्वी मूल्यांकन धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्ह्यातील एकूण ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि…

  • नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर आज सर्व सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार व CPR (Cardiopulmonary Resuscitation) देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास तिची…

  • सायबर सुरक्षेसंबंधी नळदुर्ग पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    नळदुर्ग / प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेअंतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे, यानुषंगाने गरुवार(८)ऑक्टोबर रोजी येथील अंजनी प्रशाला विद्यालयात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये आजच्या इंटरनेट, ai च्या जमान्यात सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा…