परंडा / प्रतिनिधी परंडा तालुका व शहर परिसरात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त विविध देवीच्या मंदिरात रविवार ता.११रोजी विधीवत पुजाअर्चा करुन घटस्थापना करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक भवानी शंकर मंदिर ,गारभवानी,भगवतीआई मंदिरात परंपरेनुसार धार्मिक उत्साहात घटस्थापना करण्यातआली. शहरातील भवानी शंकर मंदिरात कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती असलेल्या अंबाबाईची विधीवत पारंपरिक,धार्मिक पद्धतीने पुजा करुन भवानीशंकर मंदिराचे विश्वस्त किशोर बैरागी, कपिल बैरागी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवचे ग्रामदैवत असलेल्या श्री धारासुर मर्दिनी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धाराशिवच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून शहराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वाला प्रारंभ झाल्याने मंदिर परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.…
नगराध्यक्ष विनोद भैया गंगणे यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ; भाविकांच्या सुविधांसाठी नगर परिषद सज्ज तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव पार्श्वभूमीवर तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील परिसरात भवानी ज्योत प्रज्वलित करून नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ नगराध्यक्ष विनोद भैया (पिंटू) गंगणे यांच्या शुभहस्ते भवानी ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डासांची उत्पत्ती रोखणे,घरात डासांचा प्रवेश टाळणे आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे,या उपाययोजनांमुळे कीटकजन्य आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते.घरातील पाण्याची भांडी,ड्रम,टाक्या तसेच परिसरातील…
ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना तातडीने मदतीची मागणी धाराशिव / प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता, मतदार यादीतील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी कळंब येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला.…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिव येथील विविध शैक्षणिक संस्था आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन पदवीधरांच्या प्रश्नांवर संवाद साधला. या भेटीदरम्यान सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पदवीधरांचे न्याय्य हक्क या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात…
धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणारा मानसिक ताण-तणाव, शेतकरी व नागरिकांचे मानसिक आरोग्य तसेच आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय धाराशिव व हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद धाराशिव येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘दुष्काळातील ताण-तणावाशी सामना’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी मा. श्री…
नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक महोत्सवात स्थानिक कलावंतांना प्राधान्य देण्याची विशाल शिंगाडे यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक यांच्यासह ग्रामीण भागातील स्थानिक कलावंत आणि लोककलावंतांच्या उदरनिर्वाहावरही झाला आहे. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय…
तुळजापूर / प्रतिनिधी ‘मुलगी म्हणजे चूल आणि मूल’ या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडत तुळजापूरच्या लेकीने थेट दिल्लीवर आपली मोहोर उमटवली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी प्रवीण अपराध यांच्या कन्या कादंबरी प्रवीण अपराध हिची AIIMS CAPFIMS, दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे. बालपणापासून पाहिलेले डॉक्टर होण्याचे आणि देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेत शिक्षण…
२० हजार भाविकांची आसन क्षमता; पोलीस मदत केंद्रापासून आयसीयू, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापन कक्षाची व्यवस्था तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर शहरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करताना उन्ह, पाऊस तसेच गर्दीचा त्रास होऊ नये,…