Live News…..Breaking News!

.

  • एमटीडीसीचे उपाध्यक्ष आनंदराव जाधव यांनी घेतले तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) नवनियुक्त उपाध्यक्ष तथा शिवसेना मराठवाडा संपर्कनेते आनंदराव जाधव यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी आई भवानीच्या चरणी लीन होऊन राज्याच्या आणि मराठवाड्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. आनंदराव जाधव यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम…

  • बारातेवाडी येथे पावटयाच्या गंजीस आग लागल्याने शेतक-याचे नुकसान

    येरमाळा / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील बारातेवाडी येथील धनंजय बाळासाहेब बाराते यांच्या पावट्याच्या काढुन ठेवलेल्या गंजीला आग लावल्याने शेतकऱ्याचे पीक जळून अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले बाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. बारातेवाडी येथील शेतकरी धनंजय बाळासाहेब बाराते यांच्या पानगाव महसूल क्षेत्रात जमीन आहे.येथील त्यांचा शेतातील पावटा काढुन गंज लावुन ठेवली होती.पावसाचे वातावरण असल्याने…

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२०२६ सांगता

    धाराशिव / प्रतिनिधी केशेगाव ता. धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२०२६ चा सांगता समारंभ निमित्त गव्हाण पूजन कारखान्याचे संचालक मा. काकासाहेब केदार यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन मा.अरविंद गोरे होते. शनिवार (ता. २८)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ सांगता समारंभ कार्यक्रमाचेवेळी प्रस्ताविकपर भाषणात कारखान्याचे शेतकी…

  • शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात – न्या.शैलेश ब्रम्हेविधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

    धाराशिव / प्रतिनिधी विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती.शैलेश ब्रम्हे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या…

  • धाराशिव येथे राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा उत्साहात

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील गांधी विद्यालय चिखली येथे आज दिनांक 1.03.2026 रोजी राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही परीक्षा खो-खो इंडिया यांच्या नियमानुसार व खो खो महाराष्ट्र यांनी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील एकूण 32 पंचांनी सहभाग नोंदवून राज्यस्तरीय परीक्षा दिली. परीक्षेसाठी निरीक्षक म्हणून अहिल्यानगर…

  • दोन महिन्यात रस्त्याचे काम सुरू करण्याचे पालिकेच्या आश्वासनानंतर मुंडे यांचे पाचव्या दिवशी उपोषण मागे

    धाराशिव / प्रतिनिधी मागील पाच दिवसापासून धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर उर्फ दादासाहेब मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आज रविवारी पालिका प्रशासनाचे अधिकारी व नगरपालिकेतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या दोन महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासनानंतर व आमदार राणादादांच्या उपोषणकर्त्याशी…

  • धाराशिव जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात नळदुर्ग बस स्थानक प्रथम

    नळदुर्ग / प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानामध्ये धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग बस स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संत गाडगेबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार संपन्न झाला.नळदुर्ग बस स्थानक येथे राज्य शासनाच्या स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल वाहतूक नियंत्रक महेश डुकरे,…

  • बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक रस्त्याचे का म तातडीने पूर्ण करा : डॉ. प्रतापसिंह पाटील दिनकर दादा मुंडे यांच्या जन अमरण उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक (बार्शी नाका) हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व दैनंदिन वर्दळीचा प्रमुख मार्ग असून, या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी दिनकर दादा मुंडे यांनी सुरू केलेल्या जन…

  • मराठी दिनाच्या निमित्ताने नळदुर्ग येथे बाल सभा संपन्न,बाल दिंडी, लोकनृत्य सादरीकरण

    तुळजापूर / प्रतिनिधी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची बालसभा आणि बाल दिंडी नळदुर्ग येथे संपन्न झाली, अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विविध कला गुणदर्शन केले. कवयित्री , साहित्यिका . शिक्षिका, कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून२७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठा उत्साहात साजरा करण्यात आला .कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे…

  • वीजबिल दुरूस्त करून हफ्ते पाडून देण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मागणी केली मान्य

    धाराशिव / प्रतिनिधी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. अव्वाचे सव्वा बिल आले असून त्यात दुरुस्ती करण्यात यावी, तसेच एकदम इतकं बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळं त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदार पाटील…