Live News…..Breaking News!

.

  • पद्मश्री चैत्राम पवार यांनी उलगडले गावाच्या विकासाचे रहस्य

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट येवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय नेतृत्व विकास उद्बोधन शिबिरा मध्ये बारीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील भाग्यविधाते पद्मश्री श्री चैत्राम पवार यांनी  शिबिरार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गावाच्या विकासाचे अनेक पैलू…

  • छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा नागरिकांंनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजारमार्च ते मे दरम्यान जिल्ह्यात मंडळ व नगरस्तरावर व्यापक शिबिरे

    धाराशिव / प्रतिनिधी माहे मार्च ते मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत मार्च ते मे महिन्यात मंडळस्तरावर तसेच नगरपरिषद व नगरपंचायतस्तरावर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती…

  • आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची अफवा ;धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेल साठा मुबलक,प्रशासनाचे आवाहन

    धाराशिव / प्रतिनिधी सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.या अफवेमुळे जिल्ह्यातील सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांकडून अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवण्यासाठी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा सध्या…

  • तेरणा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले 23 लाखाचे पॅकेज; महाविद्यालयाकडून सन्मान 

    धाराशिव / प्रतिनिधी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वेळीच महत्त्व ओळखून मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊन पदवी मिळविली, त्याचा  आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. “महाविद्यालयाने दिलेल्या सॉलिडवर्क्स, कॅटिया, सीरिओ यांसारख्या सॉफ्टवेअरच्या मूलभूत प्रशिक्षणामुळे कंपनीत माझी त्वरित निवड झाली आणि आज मी २३ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत आहे. याबद्दल महाविद्यालयाचा मी ऋणी आहे,” असे गौरवोद्गार…

  • डॉ अशोक कदम यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती

    नळदुर्ग / प्रतिनिधी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अशोक कदम यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. डॉ अशोक कदम यांनी ३२ वर्ष महाविद्यालयीन सेवेत केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची या पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील…

  • पीएम श्री कळंब नगरपालिका शाळेत प्राचार्य गवळी यांचा व्याख्यान

    कळंब / शहर प्रतिनिधी येथील पीएमश्री नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. २ कळंब येथे प्राचार्य जगदीश गवळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे हे होते.पीएमश्री नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.२ कळंब येथे विविध विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

  • धाराशिव शहर आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित –नगराध्यक्षा नेहा काकडे यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासकीय पातळीवर आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना…

  • सुप्रसिद्ध चारोळीकर चंद्रशेखर गोखले यांच्या हस्ते अक्षरवेलच्या विशाखा साहित्य संमेलनाचे उदघाटन! 42 चारोळी संग्रहाचे  एकाच दिवशी प्रकाशन करून अक्षरवेलने केला नवा विक्रम !

    धाराशिव / प्रतिनिधी मराठी भाषा गौरवदिन आणि कुसुमाग्रज जयंतीचे औचित्य साधून धाराशिव शहरातील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विशाखा साहित्य संमेलनाचे शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध लेखक, चारोळीकार, कथा कादंबरीकार चंद्रशेखर गोखले,  अभिनेत्री, गायिका उमा गोखले तसेच अपूर्वाई प्रकाशन पूणे चे डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची…

  • आ. कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव कळंबचे आमदार कैलासदादा पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्यात जेजुरी, पुणे येथील संघाने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. डोरलेवाडी, बारामती संघाने द्वितीय क्रमांक, येडशी-धाराशिव (A) संघाने तृतीय क्रमांक, तर सोलापूर पोलीस, सोलापूर संघाने चतुर्थ…

  • आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराचा ठेका अखेर जनशक्ती नगर विकास आघाडीने फेटाळला

    परंडा / प्रतिनिधी परंडा नगरपरिषदची सर्वसाधारण सभा दि. ४.३.२०२६ रोजी आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर वसुली ठेकेदाराने व्यापारी तसेच शेतकरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कराची रक्कम जमा करा अशी धमकी दिली होती. हाच विषय जनशक्ती नगर विकास आघाडीने…