Live News…..Breaking News!

.

  • छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा नागरिकांंनी लाभ घ्यावा – आ.राणाजगजितसिंह पाटीलनागरिकांच्या महसुली कामांचा मंडळ स्तरावर होणार निपटारा

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना महसुली सेवा एकाच दिवशी त्याही त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव तालुक्यात विशेष महसूल महसूल शिबिरांचे आयोजन दि. ७ मार्चपासून करण्यात आले आहे या शिबिरांतर्गत नागरिकांच्या महसुली कामांचा निपटारा मंडळ स्तरावर केला जाणार असून यामुळे तालुक्याच्या ठिकाणी…

  • श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासकामे भव्य, दिव्य आणि दर्जेदार व्हावीत –पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची आढावा बैठक;

    गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार व्यक्त करत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज घेतली. कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा…

  • एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

    धाराशिव / प्रतिनिधी मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट…

  • नवीन राष्ट्रीय वीज धोरण २०२६ – हरित ऊर्जेमुळे धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या संधी

    धाराशिव / प्रतिनिधी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ’विकसित भारत – २०४७’ चे ध्येय केंद्रस्थानी ठेवून नुकतेच राष्ट्रीय वीज धोरण (एनईपी) २०२६ चा मसुदा प्रसिध्द केला आहे. २०२६ च्या मुसद्यात हरीत उर्जा निर्मितीसह विशेष महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे धाराशिव सारख्या हरीत उर्जा निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या जिल्ह्यांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय उर्जा मंत्रालयाने ’विकसित…

  • आ. प्रवीण स्वामी व जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत तुगाव येथील शेत पाणंद रस्त्यांचे लोकार्पण

    उमरगा / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत पालकमंत्री शेत पाणंद रस्ते नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत उमरगा तालुक्यातील तुगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात दिनांक २ मार्च २०२६ सोमवार रोजी पार पडला. या विकास कामामुळे तुगाव व परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे. या वेळी…

  • तुळजाभवानी मंदीरात होळी पौर्णिमा साजरी

    तुळजापूर / प्रतिनिधी हुताशनी फाल्गुनी पौर्णिमेदिनी ( होळी पौर्णिमा ) सोमवार दिनांक २ रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती . पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. श्री तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी तुळजाभवानी मातेस भाविकांचे दही दूध पंचामृत अभिषकानंतर श्री तुळजाभवानी मातेस वस्त्रालंकार घालण्यात आले , त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा करण्यात…

  • “ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!”— पालकमंत्री प्रताप सरनाईकपालकमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. “सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि…

  • पंडीत दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग संपन्नप्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे व आ. राणादादांची उपस्थिती

    धाराशिव / प्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान सध्या संपूर्ण देशभरात उत्साहात सुरू असून, त्याअंतर्गत आज सोमवारी धाराशिव येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पार पडला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये कार्यकर्त्यांना संघटन बळकटी, पक्षाची विचारधारा, मूलभूत तत्त्वे, उद्दिष्टे व आगामी…

  • जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये..परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत…

  • जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने जब्राटच्या प्रगती कोळगेंना शुभेच्छा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयाच्या भूमीकन्या व अनिवासी भारतीय धाराशिव तालुक्यातील पळसवाडीची कन्या प्रगती बाबुराव कोळगे यांनी जब्राट चित्रपटाची कथा – संवाद – दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो समस्त धाराशिवकरांसाठी अभिमानाची बाब असल्याने  , राष्ट्रीय पातळीवर कलाकारांचे संघटन असलेली धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने त्यांचा संस्कार भारतीची दैनंदिनी देऊन…