Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव, कळंब, तुळजापूरवर फुलले ‘कमळ’जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्वकळंबमध्ये ‘ईश्वरचिठ्ठी’ चा सकारात्मक राजकारणाला कौल 

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयामुळे जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला…

  • परंडा पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या अर्चना जाधव तर उपसभापतीपदी परसू गवारे यांची निवड

    परंडा / प्रतिनिधी परंडा- भूम- वाशी मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा पंचायत समिती सभापती पदी सौ.अर्चना अण्णासाहेब जाधव यांची तर उपसभापतीपदी परसू गवारे यांची निवड करण्यात आली आहे. परंडा पंचायत समिती सभागृहात आज दिनांक 6 मार्च शुक्रवार रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत…

  • जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणीसर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प –

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार धाराशिव / प्रतिनिधी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या आपण मांडलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आता मोठी गती मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित…

  • शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी व युवकांना दिलासा देणारा आहे. पीक कर्जमाफीसाठी करण्यात आलेली तरतूद, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ तसेच सौर ऊर्जा योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय युवकांसाठी संधी निर्माण…

  • वास्तवापासून फारकत घेतलेला अर्थसंकल्प, व्हाईट कॉलर, धनदांडगे यांचा विचार मात्र सामान्य माणूस दुर्लक्षित – खासदार ओमराजे निंबाळकर

    धाराशिव / प्रतिनिधी सरकारने जनतेच स्वप्नरंजन करण्याचा प्रयत्न केला असाच हा अर्थसंकल्प आहे. वास्तव परिस्थितीच भान हरवलेला हा अर्थसंकल्प दिसत आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेलं सरकार केलेल्या घोषणा पूर्ण कस करणार एवढं जनतेला सांगावं असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला दिले आहे. यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजनेला इतका विलंब केल्यान या योजनेतील…

  • *शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा अर्थसंकल्प – नितीन काळे

    धाराशिव / प्रतिनिधी भारत देशातील सर्वात बलवान राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्याच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेतकरी, युवाशक्ती, नारीशक्ती आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असून राज्यातील सर्व घटकांना न्याय देत पायाभूत विकास कामांना गती देत राज्याला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाबद्दल राज्यातील महायुती…

  • मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल

    धाराशिव / प्रतिनिधी मागच्या वेळी याच सरकारने दिलेली कर्जमाफीचा कसा अनुभव आला हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे आताही अटी निकष पूर्ण करण्यात यानी पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवू नये असे म्हणत जोवर कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तोवर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी आमदार पाटील…

  • धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करादर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करापालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांचे निर्देश

    धाराशिव   /  प्रतिनिधी धाराशिव येथे रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. मंत्रालयात पार पडलेल्या संयुक्त आढावा बैठकीत त्यांनी या लोकहितकारी प्रकल्पाचे काम…

  • एसटीत मद्यपानास ‘ शून्य सहनशीलता ’परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीचालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अशी माहिती परिवहन…

  • चेन्नई–सुरत  ग्रीन  फील्ड  महामार्गासाठी  संपादित जमिनींना वाढीव व न्याय्य  मोबदला द्यावा  — डॉ. प्रतापसिंह  पाटील

    धाराशिव /  प्रतिनिधी चेन्नई–सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. मात्र या जमिनींसाठी जाहीर करण्यात आलेला मोबदला अत्यल्प व अन्यायकारक असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत प्रशासनाने निश्चित केलेले दर समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे. डॉ. पाटील यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामासाठी संपादित होणाऱ्या अनेक जमिनी बागायती स्वरूपाच्या असून त्या ठिकाणी ऊस, फळबागा तसेच इतर कायमस्वरूपी पिके आहेत. मात्र जमिनीचा दर्जा, पिकांची किंमत आणि भविष्यातील उत्पादनक्षमतेचा योग्य विचार न करता मोबदला निश्चित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या खरी किंमतीपेक्षा कमी मोबदला मिळत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच महामार्गामुळे अनेक शेतजमिनी दोन्ही बाजूंनी विभागल्या जाणार असून त्यामुळे शेती करणे अधिक कठीण होणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सोयींची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य दरासह वाढीव मोबदला देणे, तसेच पुनर्वसन व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. या संदर्भात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदला मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.