Live News…..Breaking News!

.

  • बीयाॅंड द बॉडी….

    विश्वात प्रत्येकाचा जन्म स्त्रीपासूनच झालेला आहे. म्हणजेच स्त्री ही जीवनाची आद्य शक्ती आहे. हे इटर्नल Truth असलं तरी संपूर्ण विश्वामध्ये स्त्रीकडे पाहण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन यामध्ये प्रचंड तफावत आहे. संपूर्ण जगामध्ये भारत ही सगळ्यात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. आणि आपण फक्त आपल्याच देशाचा जरी विचार करायचा ठरवला तर स्त्री या एका शब्दाला अनेक अँगल आहेत…

  • महिला दिनानिमित्त शिवसेनेकडून महिला कामगारांना साहित्य वाटपपालकमंत्री सरनाईक व आ. सावंत यांचा पुढाकार

    भूम / प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना व युवासेना यांच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांसाठी साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत,युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या प्रयत्नातून भूम, परंडा व…

  • आंबेडकर कारखान्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेती प्रकल्पाची पाहणी

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव कार्यक्षेत्र मौजे बेंबळी व टाकळी येथे ऊस पिकातील AI (एआय) तंत्रज्ञानात भाग घेतलेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन रत्यांच्या अडीअडचणी विचारून त्या सोडवण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद(दादा) गोरे, संचालक अँड निलेश पाटील, भारत गुंड, राहुल…

  • तेर येथील विविध विकासकामांची आ. राणादादांनी केली पाहणी

    धाराशिव / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला १३ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या अनुषंगाने येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी मित्र चे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका देवस्थान हे एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सुमारे १३…

  • सद्गुरु यज्ञेश्वर शिवाचार्य ( वेडे महाराज) यांच्या पुण्यतिथी निमित्त परांडा शहरात रथोत्सव व शोभायात्रा उत्साहात .

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज ) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य रथोत्सव शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. परंपरेनुसार परंडा शहरातील भोत्रा रोड येथील वेडे महाराज मठात बुधवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दि ७ मार्च शनिवार रोजी पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ ते ११ या वेळेत सिधलिंग…

  • भगतवाडी ग्रुप ग्रामपंचायत विषयी नागरिकांच्या तक्रारीची आठवड्याच्या आत चौकशी करून अहवाल सादर करा.सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या प्रशासनास सूचना.सभापती यांच्या आश्वासनाने उपोषणास स्थगिती.

    मुरुम / प्रतिनिधी उमरगा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी सभापती निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कामास सुरुवात केली. भगतवाडी कोळेवाडी चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विषयास अनुसरून नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार दिल्या होत्या व मागील दहा दिवसापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बलभीम इरले व बालाजी करणुरे हे ग्रामस्थ आमरण उपोषनास बसले होते.या अनुषंगाने…

  • भूम – परंडा -वाशी पंचायत समितीवर माजी मंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांचे वर्चस्वभूममध्ये शिवसेनेच्या पूजा ढगे, परंडयात अर्चना जाधव तर वाशीमध्ये प्रणिता गायकवाड यांची सभापतीपदी निवड

    धाराशिव / प्रतिनिधी भूम, परांडा आणि वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजीमंत्री प्रा.डाँ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर भूम -परंडा – वाशी या तिन्ही पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा विजय म्हणजे केवळ निवडणुकीतील विजय नसून, आपण केलेल्या विकासकामांवर जनतेने उमटवलेली मोहोर आहे असे मत आ. सावंत यांनी समाजमाध्यमाद्वारे…

  • कळंब पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या राजश्री वरपे तर उपसभापतीपदी भाजपच्या प्रणिता चव्हाणकळंब मध्ये महिलाराज सभापती व उपसभापती पदी महिलांची निवड.

    कळंब / शहर प्रतिनिधी कळंब पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या राजश्री वरपे यांची तर उपसभापतीपदी भाजपच्या प्रणिता चव्हाण यांची निवड झाली. ही निवड जाहीर होताच महायुती कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समितीसाठी १६ गणामधून निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये महायुती घटक पक्ष असलेल्या भाजपचे ५ उमेदवार, तर शिवसेनेचे ३ उमेदवार, एकूण महायुतीचे ८ उमेदवार विजयी झाले होते तर…

  • उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कु. आकांक्षा चौगुले तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. रेखा इंगळे यांची निवड

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कु. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. रेखा विक्रम इंगळे यांची मतदान होऊन निवड करण्यात आली आहे. उमरगा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पदासाठी निवड शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पहिल्यांदा सभापती पदी शिवसेनेच्या कु. आकांक्षा ज्ञानराज…

  • अर्थसंकल्पात शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग– डॉ.प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि तरुणांच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली. डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, राज्यातील शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मिती,बेकारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे…