धाराशिव / प्रतिनिधी खामगाव (ता. जि. धाराशिव) येथील प्रेमराज संपत गव्हाणे यांनी केवळ वयाच्या 21 व्या वर्षी पीएसआय पदासाठी स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून 8 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांंचा श्री सिध्दीविनायक परिवाराच्यावतीने परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घरची नाजूक आर्थिक परिस्थिती…
तुळजापूर / प्रतिनिधी भारतीय माती शैली कुस्ती विभाग आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ साठी धाराशिव जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवार, दिनांक ८ रोजी तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील श्रीमंत कुस्ती आखाडा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये पैलवानांनी दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यामध्ये ५५ किलो गटात पैलवान ओंकार नरवटे…
धाराशिव / प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांना स्विफ्टलिफ्टSwiftnlift या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. औंध येथील भारतरत्न भीमसेन जोशी कला मंदीर येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार समारंभात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक गौरविण्यात…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प अंतर्गत उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन कंडारी कालवा द्वारे सुरू झाले असून आज सोमवार दि.९ मार्च रोजी तालुक्यातील भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी या पाण्याचे पुजन केले. सिना कोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला असून शेतकऱ्यांना वेळोवेळी सिना कोळेगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कल्याणी कालेकर- पाटील, अधिकारी श्री…
येरमाळा / प्रतिनिधी येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा यावर्षी २ एप्रिल ते ७ एप्रिल च्या दरम्यान होणार असुन येथील शहीद जवान शंकर बारकुल सभागृहात पार पडलेल्या यात्रेच्या प्रशासकीय नियोजन बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने विविध विषयांवर आज सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे यात्रा काळात विद्युत…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथे शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधीपती तथा श्री राजगुरू शिवलिंगेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून श्री राजगुरू गुरुकुल (CBSE पॅटर्न) विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या विद्यालयाच्या भव्य इमारतीचा कोनशीला समारंभ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची विशेष पूजा करण्यात येऊन देवीला पारंपरिक पद्धतीने रंग लावण्यात आला. रविवारी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला. त्यानंतर त्या पांढऱ्या शालूवर सप्तरंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. महंत व…
तुळजापूर / प्रतिनिधी रंगपंचमी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून तो मानवी मनातील द्वेष विसरून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा उत्सव आहे. हाच संदेश अधोरेखित करत तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगरमध्ये अत्यंत उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने नैसर्गिक रंगपंचमी साजरी करण्यात आली. रासायनिक रंगांना फाटा देत केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करून आरोग्याप्रती जागरूक राहण्याचा एक नवा पायंडा…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगर परिषद अंतर्गत श्री अंबाबाई मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन तसेच सुमारे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मित्रा चे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात सर्वत्र सुरू…
मुरूम ( म. नेता ) शहरी भागात हुरडा पार्ट्यांचे व्यवसायिकीकरण झालेले असताना उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपारिक हुरडा पार्ट्यांवर शेतकरी बांधव मात्र भर देताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह सीमावर्ती ग्रामीण भागात हिवाळ्यात रंगणाऱ्या हुरडा पार्ट्यांचा उत्साह यंदाही ओसंडून वाहताना दिसत आहे. उमरगा तालुक्यातील बेळंब येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे यांनी आपल्या मित्र परिवाराला एकत्रित…