जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक धाराशिव / प्रतिनिधी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्य सचिव श्रीमती स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,अन्न व औषध प्रशासन…
महिला – भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337 व्या बलिदान दिनानिमित्त धाराशिव शहरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने आज छत्रपती संभाजी महाराज चौक , लेडीज क्लब येथे रक्तदान महाशिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये धाराशिव शहरातील १७२ शिवशंभू भक्तांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरामध्ये महिला भगिनींनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी समितीचे अध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस धाराशिव नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने दि.१० मार्च रोजी भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र ( प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. यावेळी कंपनीच्यावतीने आसाराम काळे यांनी शिष्टमंडळास कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ? त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर होऊन त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नगरसेवकांच्या मतांचा विपर्यास थांबवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, जेणेकरून चर्चेचा विपर्यास टाळता येईल. सभेस पत्रकारांना प्रवेश द्यावा, जेणेकरून जनतेपर्यंत अधिकृत माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसण्याची व्यवस्था करावी.स्वाक्षरी बंधनकारक करावी सभेचे इतिवृत्त (Proceeding) लिहिताना दोन्ही गटनेत्यांच्या…
उमरगा / प्रतिनिधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानातून आयएसओ मानांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय तीन लाख व जिल्हास्तरीय पाच लाखाचे बक्षीस मिळवणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील सहावी ते आठवीच्या वर्गातील 12 विद्यार्थी व नववीचे आठ विद्यार्थी राज्यांतर्गत पुणे येथील अभ्यास दौरा तर राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी केरळची सफर करणार आहेत. यात…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरातील मध्यवर्ती पाणी पुरवठ्यातून दूषित व अस्वच्छ पाणी येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांत पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही बदललेला दिसत आहे. त्यामुळे…
मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे आता नवीन ‘जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय’ स्थापन करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. मंगळवारी तसा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा डोंगर आणि पक्षकारांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या…
धाराशिव / प्रतिनिधी प्रा. सुबोध कांबळे यांनी नुकतीच पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा व्ही.पी. शैक्षणिक संकुलात विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.पी. शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तसेच एसबीएनएम फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे आणि एस.पी. पॉलीटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे उपस्थित…
नगरसेवक घाटगे व व्यापाऱ्यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान नगरपालिका शॉपिंग सेंटर समोरील झाडे न तोडण्याची मागणी निवेदनाद्वारे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक संतोष उर्फ नाना घाटगे यांनी व या परिसरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,…
धाराशिव / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात विशेष कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार 9 मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी , कर्मचारी ,रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता…