Live News…..Breaking News!

.

  • सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा

    धाराशिव / प्रतिनिधी राज्याला त्याच्या अर्थव्यवस्थेच्या टक्केवारीच्या २५ टक्केपर्यंत कर्ज घेता येते, मात्र आता सरकरने घेतलेल्या कर्जाची रक्कम ही जवळपास २४ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. साहजिक राज्य आर्थिक दिवाळखोरीत आल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात सांगून सरकारला आरसा दाखवण्याचं काम केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेत ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, सरकार जे आकडे…

  • ज्ञानज्योती अभ्यासिकेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सभापती ॲड आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार

    मुरुम / प्रतिनिधी ज्ञानज्योती फाउंडेशन यांच्यावतीने व उमरगा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, उमरगा यांच्या सहकार्याने उमरगा येथे सुरू असलेल्या ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा वाचनालय येथील विद्यार्थी इरफान शेख रा.नागराळ ता.उमरगा याची पोलिस उपनिरीक्षक पदी व ज्ञानज्योती फाउंडेशनचा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी चि.बलराज पाटील रा.कंटेकुर ता.उमरगा याने चार्टर्ड अकाऊंटन्ट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल या दोघांचा ही ज्ञानज्योती…

  • केशेगाव येथील समाधान शिबीरास नागरिकांंचा प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील केशेगाव या मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 01 अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरील अभियानाचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मा. श्रीमती ज्योती पाटील मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मा. ओंकार देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास केशेगाव मंडळातील सन्मानीय…

  • ऊस उत्पादनात एकरी 70 टनावरुन 100 टन मिळविण्यासाठी धुता गावातील तरुण शेतकऱ्यांचा पुढाकार

    धाराशिव / प्रतिनिधी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव कार्यक्षेत्र मौजे धुत्ता येथे ऊस पिकातील AI (एआय) तंत्रज्ञानात भाग घेतलेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी विचारून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. येथील शेतकऱ्यांनी कारखान्या मार्फत शेतकऱ्यांना बारामती कृषी प्रदर्शन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ज्ञानयाग प्रशिक्षणाला घेऊन गेल्याने…

  • बावची विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण

    परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा . या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक…

  • हाँटेलमध्ये कार घुसल्याने झालेल्या अपघातात माजी नगरसेवकासह उद्योजक ठार ; एकजण गंभीर जखमीउमरगा जकेकूर चौरस्ता जवळ झाला भिषण अपघात

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा जकेकूर चौरस्ता जवळील राष्ट्रीय महामार्गालगत भारत टायरचे समोरील बाजूस हॉटेल मध्ये चहा पित गप्पा मारणा-या तिघांना महामार्गावरून जाणाऱ्या सुसाट कारने हॉटेल मध्ये घुसून जागेवर एक माजी नगरसेवक व एक उद्योजक जागीच ठार झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवारी दि(१०) रोजी दुपारी 03ते साडेतीनच्या दरम्यान…

  • सोलापूर-अक्कलकोट मार्गासाठी १०५ कोटी मंजुरकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार प्रयत्नाला यश; आमदार राणाजगजितसिंह पाटील 

    नळदुर्ग ते अक्कलकोट दरम्यानच्या १४.१७ किमी उर्वरित कामाचा मार्ग मोकळा केंद्र सरकारचा मोठा निर्णय धाराशिव / प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६५२ वरील नळदुर्ग ते अक्कलकोट या विभागाच्या पुनर्वसन आणि सुधारणेच्या कामाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पांतर्गत उर्वरित १४.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या…

  • ‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते – डॉ.धनंजय चाकुरकर

    धाराशिव / प्रतिनिधी काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे सहसा सहज ओळखता येत नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन योग्य वेळी उपचार घेतल्यास काचबिंदूमुळे होणारे अंधत्व टाळता येऊ शकते,असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी केले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने ८ मार्च…

  • पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकारआरोग्य तपासणी शिबिरात ७१ जणांची तपासणी

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आज ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे पार पडलेल्या या शिबिराला जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये…

  • रुपामाता नँचरल शुगर पाडोळी (आ) युनिटच्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता

    धाराशिव / प्रतिनिधींनी रुपामाता नॅचरल शुगर, पाडोळी (आ.) युनिट क्र. १ या कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५-२६ ची यशस्वी सांगताझाली. आज रुपामाता नॅचरल शुगर, पाडोळी (आ.) युनिट क्र. १ येथे गाळप हंगाम २०२५-२६ ची सांगता पारंपरिक पद्धतीने रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक चेअरमन अँड.व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते गव्हाणी पूजन करून करण्यात आले या हंगामात १२५ दिवसांत एकूण…